सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
शेतकरी कामगार पक्षाने संपूर्ण सांगोला मतदारसंघात प्रचाराची राळ उडवून दिली आहे. सर्वच गावांमध्ये त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत आहे. काल गुरुवारपासून भाळवणी जि.प. गटात डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख तसेच शेकापची नेतेमंडळी तळ ठोकून आहेत. आज शुक्रवारीही संपूर्ण दिवसभर या गटात कॉर्नर सभा तसेच जाहीर सभा होत आहेत. या सर्व सभांमध्ये तरुण तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने या गटातील मतदार शेतकरी कामगार पक्षाच्या गुलालाचा शिल्पकार होणार! यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.
भाई गणपतराव देशमुख यांनी तिसंगी सोनके तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी या भागात मोठ्या आंदोलन केले होते ते स्वतः या तलावाच्या कोरड्या पडलेल्या नदीत शेतकऱ्यांसमवेत आंदोलनाला बसले होते. भर थंडीच्या दिवसात त्यांनी येथे त्यांनी अनेक रात्री मुक्काम केला होता. या आंदोलनाची महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली होती.
भाळवणी हा जिल्हा परिषद गट सांगोला विधानसभा मतदारसंघाशी संलग्नित करण्यात आल्यापासून या गटातील सर्वच गावांनी भाई गणपतराव देशमुख यांना यापूर्वीपासून साथ दिली आहे. या गटातील बहुतांशी गावे जलसिंचनाच्या प्रकल्पाखाली येत असल्याने येथे पाण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. या गटात भाई गणपतराव देशमुख यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात अनेक विकास कामे केले आहे. मात्र मागील पाच वर्षात या गटातील जनता अक्षरशा वाऱ्यावर सोडण्यात आली, असा आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत. मागील पाच वर्षांत विद्यमान लोकप्रतिनिधी आमच्या गावात आलाच नाही, आम्ही आमचे प्रश्न आणि कुठे मांडायचे? असा सवाल अनेक गावातील शेतकरी, कामगार तसेच तरुण वर्गाने केला आहे.
या जिल्हा परिषद गटात लोणारवाडी, गार्डी, सोनके, तिसंगी, खेडभाळवणी शेळवे, भंडीशेगाव, उपरी, सुपली, पळशी, जैनवाडी, धोंडेवाडी, केसकरवाडी, शेंडगेवाडी, भाळवणी आदी गावांचा समावेश होतो. या सर्व गावातील प्रश्न समजून घेऊन ते मार्गी लावण्याचे काम भाई गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात केले. सांगोला पासून हा जिल्हा परिषद गट त्या अर्थाने लांब असला तरीही भाई गणपतराव देशमुख हे या गटातील गावांमध्ये सातत्याने येत असत. इथल्या बुजुर्ग तसेच तरुण कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क होता.
तिसंगी – सोनके तलावाच्या पाण्यासाठी केला होता संघर्ष
भाई गणपतराव देशमुख यांनी तिसंगी सोनके तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी या भागात मोठ्या आंदोलन केले होते ते स्वतः या तलावाच्या कोरड्या पडलेल्या नदीत शेतकऱ्यांसमवेत आंदोलनाला बसले होते. भर थंडीच्या दिवसात त्यांनी येथे त्यांनी अनेक रात्री मुक्काम केला होता. या आंदोलनाची महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली होती.
भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर या जिल्हा परिषद गटातील विविध प्रश्नांसाठी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सातत्याने अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. या भागातील लोकांचे प्रश्न समजून घेतले. तिसंगी सोनके तलावाच्या पाण्यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही या भागात अनेकदा आवाज उठवला आहे.
सोनके-तिसंगी मध्यम प्रकल्प
सोनके-तिसंगी मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 26.16 द.ल.घ.मी., मृत पाणीसाठा 1.69 द.ल.घ.मी., उपयुक्त पाणीसाठा 24.47 द.ल.घ.मी., तळ संचय पातळी 297.25 मीटर, पूर्ण संचय पातळी 306.62 मीटर, तलाव माथा पातळी 309.45 मीटर आहे. सोनके-तिसंगी तलाव वीर-भीटघर धरणातील ओव्हरफ्लो पाण्याने भरला जातो. या तलावाच्या पाण्यामुळे परिसरात हजारो एकर बागायती क्षेत्र वाढले असून ऊस, डाळिंब, बोर, केळी, पपई, शेवगासह जिरायती पिकांस मोठा फायदा होत आहे.
या तलावाच्या पाण्यावरच या भागातील अर्थकारण अवलंबून आहे. विद्यमान लोकप्रतिनिधीकडून या प्रश्नावर कोणतेच काम न झाल्यामुळे या भागातील जनता नाराज आहे. हा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाने सातत्याने उचलून धरल्याने आणि सोडवल्याने बाबासाहेब देशमुख यांना या भागात मोठी सहानुभूती मिळताना दिसत आहे.