सांगोल्यात बापू- आबा गटाला हाबडा
माजी नगरसेवक विजय राऊत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची शेकापत घरवापसी
सांगोला : विशेष प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभेची जोरदार बांधणी सुरू असताना शेतकरी कामगार पक्षांमध्ये दररोज पक्षप्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यातच आता सांगोला शहरातील पश्चिम भागातील दीपक आबांचे कार्यकर्ते व सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय राऊत यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात घर वापसी केल्यामुळे पश्चिम भागात पुन्हा ताकद वाढली आहे. विजय राऊत यांनी शेतकरी कामगार पक्षात पुन्हा घर वापसी केल्यामुळे दीपक आबांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी बापू गटाच्या कार्यकर्त्यांनीही शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला पश्चिम भागातील मोठे बळ मिळाले आहे.
माजी नगरसेवक विजय राऊत व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा व शहाजी बापू पाटील यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा राऊत मळा येथे संपन्न झाला
यावेळी चिटणीस दादाशेठ बाबर, मारुती बनकर, बाळासाहेब एरंडे, डॉ.प्रभाकर माळी, सीए के.एस.माळी, भीमराव राऊत, भारत बनकर, सुरेश माळी, निवृत्ती फुले, गोविंद माळी, अजित गावडे, भीमराव राऊत, सचिन फुले, नीलकंठ लिंगे सर यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेतकरी कामगार पक्षात विनायक राऊत, रामचंद्र राऊत, रमेश फुले, अजित फुले प्रवीण फुले, पवन क्षीररसागर, भारत जाधव चंद्रकांत फुले संजय माळी गणेश नवले संतोष नवले तानाजी राऊत दत्तात्रय फुले, संजय गाडे, रोहित वाघमारे, ऋतुराज यादव, निवृत्ती राऊत, भारत राऊत, मोहन राऊत, हणमंत राऊत,आर. ए .बनकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात घरवासी केली
डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, शहरातील पश्चिम भागातील आबासाहेबांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्वांनी कठीण परिस्थीत माझ्यासारखा तरुणाला साथ देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तुमचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकत नाही. जेवढा मान सन्मान आबासाहेबांना मिळाला तेवढाच मान तुमचा आहे. या भागातील बरीचशी कामे आबासाहेबांनी पूर्ण केली असून अपूर्ण सर्व कामे पूर्ण करू. 23 तारखे पर्यंत तुम्ही मला पदरात घ्या त्यानंतर आयुष्य भर मी तुमच्या सेवेत राहीन. क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई यांचा सांगोला शहरात पूर्णाकृती पुतळा करून देण्याची जबाबदारी आम्ही नक्की पूर्ण करू असा विश्र्वास देत सर्वांनी शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून माझ्या शिट्टी या चिन्ह समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
प्रास्ताविक व सूत्र संचालन सोमनाथ राऊत म्हणाले, स्व.आबासाहेब यांनी तालुक्यात रक्ताची नाती जोडली तीच नाती आपण जपुयात. असे आवाहन करत डॉ. बाबासाहेब देशमुख यांना विजयी करून असे आवाहन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.प्रभाकर माळी म्हणले, आज पर्यंत शेकाप ला आपण मतदान केले तेवढाच परतावा आबासाहेब यांनी आपणाला दिला आहे.त्यामुळे माळी समाज ताठ मनाने जगात आहे. सांगोला तालुक्यात गुंडगिरी आणि टक्केवारीचे राजकारण एकीकडे तर डॉ बाबासाहेब एकीकडे असे सुरू असून आपल्या विचाराचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीमागे खंबीरपण उभे रहातात आणि एकीचे बळ दाखवूया असे आवाहन केले.
आता फक्त लीड मोजा आता:- विजय राऊत
यावेळी माजी नगरसेवक विजय राऊत म्हणाले, सर्वाचा एकच सुर होता तुम्ही शेकाप मध्ये या, समाजासाठी एकत्रित राहणे गरजेचे असून शेतकरी कामगार पक्ष हा आमच्या भागाचा बालेकिल्ला राहिला आहे आणि हाच बालेकिल्ला अजून 100 टक्के बळकट करून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना आमदार करूनच श्वास सोडू असा विश्वास देत आता फक्त लीड मोजा असे सांगितले.