
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई स्व.गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण आणि महाविद्यालयाचा नामकरण सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. मात्र, या कार्यक्रमात देशमुख कुटुंबियांकडून फक्त डॉ. अनिकेत देशमुख यांनीच भाषण केले. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा भाषण करणाऱ्यांच्या यादीत समावेश नव्हता. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत नाराजी पसरल्याचे दिसून आले. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या काही समर्थकांनी कार्यक्रम संपल्यानंतर स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर जावून डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
दरम्यान, या प्रकाराबाबत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेबाबत सविस्तर खुलासा केला आहे. “हा संपूर्ण कार्यक्रम संस्थेचा होता. त्यांनी त्या गोष्टी ठरविल्या त्याप्रमाणे झाल्या. मी त्या संस्थेचा सदस्य नाही. कार्यकर्त्यांनी नाराज होण्याचे कोणतेही कारण नाही. आपण फक्त आबासाहेबांच्या कार्याप्रमाणे जनतेची कामे करीत राहायचे.” असा खुलासा पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी “थिंक टँक” शी बोलताना केला.
भाई गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली होती. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील बहुतांशी नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सांगोला येथील भाई गणपतराव देशमुख महाविद्यालय येथे हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाल्यानंतर पहिले भाषण डॉ. अनिकेत देशमुख यांनी केले. त्यांनी या भाषणात भाई गणपतराव देशमुख यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून ते अगदी शेवटपर्यंतच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
बाबासाहेबांच्या भाषणाची प्रतिक्षा
या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे भाषण होईल अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. डॉ. अनिकेत देशमुख यांचे भाषण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खा. शरद पवार यांनी सविस्तर भाषणे केली. दोन मोठ्या नेत्यांच्या भाषणानंतर आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
अशाच खणखणीत राजकीय बातम्या वाचण्यासाठी थिंक टँक लाईव्हच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.. 🔗
https://chat.whatsapp.com/I8FYNy5fFPaF7FCRbfYPiW
बाबासाहेब यांचे खणखणीत भाषण होईल असा त्यांच्या समर्थकांचा अंदाज होता. मात्र तसे झाले नाही. पूर्व नियोजनानुसार किंवा महत्त्वाच्या नेत्यांच्या वेळेच्या व्यस्ततेमुळे कमी वेळेत हा कार्यक्रम उरकावा लागणार असल्याने डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या भाषणाचा समावेश केला नसावा. मात्र असे असले तरीही डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे भाषण स्टेजवरील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत व्हावे अशी तीव्र इच्छा त्यांच्या समर्थकांची होती. मात्र, डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे भाषण झाले नसल्याने त्यांचे समर्थक नाराज झाल्याचे दिसून आले.
बाबासाहेब समर्थकांची घोषणाबाजी
डॉ.बाबासाहेब देशमुख यांना या कार्यक्रमात बोलण्याची संधी न दिल्याने तालुक्यातील कार्यकर्ते नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने दिली. या कार्यक्रमाचे निमंत्रण देतानाही डॉ. बाबासाहेब देशमुख यांना डावलण्यात आल्याचीही चर्चा होताना दिसत आहे.
कार्यक्रम संस्थेचा, मी सदस्य नाही : डॉ.बाबासाहेब देशमुख
“हा संपूर्ण कार्यक्रम संस्थेचा होता. त्यांनी त्या गोष्टी ठरविल्या त्याप्रमाणे झाल्या. मी त्या संस्थेचा सदस्य नाही. कार्यकर्त्यांनी नाराज होण्याचे कोणतेही कारण नाही. आपण फक्त आबासाहेबांच्या कार्याप्रमाणे जनतेची कामे करीत राहायचे. आमच्या कुटुंबियातील कोणत्याही प्रकारचा कलह नाही. जे काही आहे ते जनताच ठरविणार आहे. त्यामुळे तालुकावासियांच्या कामासाठी मी 24 तास सेवेत आहे. असा खुलासा पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी “थिंक टँक” शी बोलताना केला.
भाषण करू न दिल्याने पुतळ्यासमोर घोषणाबाजी.. पाहा व्हिडिओ
हेही वाचा
शहाजीबापूंनी अनिकेत देशमुखांचा हात धरला अन् समर्थकांनी केला जल्लोष
सांगोलेकरांनी शेकाप आणि काँग्रेस सोडून दुसरा पक्ष स्वीकारला नाही
59 वर्षे एकच झेंडा आणि पक्ष : निष्ठेचं दुसरं नाव ‘भाई गणपतराव देशमुख’