सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
सांगोला तालुक्यातील मोठ्या संख्येने असलेला आंबेडकरी समाज शेकापच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे. सांगोला येथील आंबेडकरी समाजाचे नेते नेते बापूसाहेब ठोकळे आणि नामवंत वकील तथा आंबेडकर नेते अक्षय बनसोडे यांनी आज शेतकरी कामगार पक्षाला आंबेडकरी समाजाचा पाठिंबा जाहीर केला. या कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख, शेकाप नेते मारुती बनकर, बाळासाहेब एरंडे बापूसाहेब ठोकळे अक्षय बनसोडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेकाप उमेदवार बाबासाहेब देशमुख म्हणाले की, मागील साठ वर्षात सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाने शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा जोपासले आहे. वंचित बहुजन अल्पसंख्यांक मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली आहे. भाई गणपतराव देशमुख हे जातीयवादाविरोधात होते. सांगोला तालुक्यातील आंबेडकरी समाजाने मला पाठिंबा दिल्याने दहा हत्तींचे बळ आले आहे. निळा झेंडा आणि लाल बावटा घेऊन मी विधानसभेत प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सांगोला शहरासह तालुक्यातील आंबेडकरी वंचित मागासवर्गीय समाजाच्या केसाला जरी धक्का लागला तरी गाठ बाबासाहेबांशी आहे. या समाजाला सोबत घेऊन आगामी काळात मोठे काम उभा करणार आहे.
बापूसाहेब ठोकळे म्हणाले की, मागील पाच वर्षात सांगोला तालुक्यातील आंबेडकरी समाजावर मोठा अन्याय झाला आहे. सातत्याने समाजामध्ये वाघ निर्माण केले जात आहेत. आंबेडकरी समाजाला राजकीय क्षेत्रात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणतेही स्थान दिले जात नाही.
मिलीभगत करून अनेकांनी आपले घरे भरून घेतले आहेत. आणि आता ते लोकांना मत मागण्यासाठी जात आहेत. फक्त राजकारणापुरता वापर करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी मी सांगोला तालुक्यातील हजारो आंबेडकरी कार्यकर्त्यांना घेऊन सोबत अक्षय बनसोडे यांच्या बुद्ध भीमराव बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिला आहे.
व्हिडीओ पहा