ताजे अपडेट
Trending
डाळींब प्रक्रिया उद्योगासह भ्रष्टाचारमुक्त सांगोला बनवण्याचा शेकापचा संकल्प
शेकापचा अजेंडा प्रसिद्ध, विकासावर भर
सांगोला : डॉ. नाना हालंगडे
महाविकास आघाडी, शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. त्यांनी आपल्या प्रचारात राजकीय टिकेऐवजी विकासात्मक मुद्दे पुढे आणले आहे. याच अनुषंगाने शेकापकडून संकल्प – 2024-29 हा अजेंडा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अजेंड्यात नेमकं काय?
- महिला संरक्षणास प्राधान्य
- एमआयडीसी प्रकल्प उभारणे
- आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती
- अत्याधुनिक सोयींनी युक्त हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज
- स्वतंत्र आरटीओ ऑफिस
- दिव्यांगांसाठी स्वतंत्र सेवा केंद्र
- भ्रष्ट्राचारमुक्त सांगोला
- खेळाडूंना मैदाने प्रशिक्षण व आधुनिक सुविधा
- एआयबीपी योजनेमध्ये सांगोल्याचा समावेश करणे
- अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त दुग्धजन्य प्रक्रिया उद्योगास चालना
- शेतकऱ्यांसाठी चोवीस तास वीज पुरवठा व संपूर्ण कर्जमाफी
- तालुक्यातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण
- बचत गटातील उत्पादनासाठी स्वतंत्र मार्केट उपलब्ध करून देणे
- डाळिंब प्रक्रिया उद्योग व रोजगार निर्मिती
- विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभा करणे
या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असलेल्या संकल्पनाम्यातून शेकापने मतदारांना साद घातली आहे.