सांगोला : विशेष प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी पोलीस अधिकारी पैलवान शशिकांत देशमुख यांच्या सत्काराचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे.
पोलिस दलात कर्तव्य बजावून कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या तसेच यशस्वी रित्या सेवा पार पाडून सेवानिवृत्त झालेल्या माजी खेळाडू यांचा सेवानिवृत्ती समारंभ मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात येत आहे
१५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता पोलिस संकुल कुस्ती हॉल, नायगांव, दादर, मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात शशिकांत देशमुख यांच्यासह पै. बाजीराव कळंत्रे (सेवा निवृत्त स.पो. आयुक्त), पै. मधुकर शिंगटे, पै. कुबेर पाटील पै. रमेश गिरी, पै. प्रकाश गिरी, पै. प्रताप लोखंडे, पै. दादासाहेब शेळके (सेवा निवृत्त स.पो. आयुक्त.), पै. दिनकर पाटील, पै.संपत कासुरडे, पै. संदीप निघोट, पै. दशरथ तळेकर यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई पोलिस दलातील सर्व आजी माजी कुस्ती खेळाडू यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.