सांगोला : विशेष प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, जनसुराज्य पार्टी आणि रयत क्रांती शेतकरी संघटना मित्र पक्षांचे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हे आज गुरुवार 7 नोव्हेंबर रोजी चोपडी गटात आपला प्रचार दौरा करणार आहे. ते या गटातील एकूण बारा गावांमध्ये ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेऊन तेथे कॉर्नर बैठक घेणार आहेत.
महायुतीचे अधिकृत उमेदवार शहाजीबापू पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मागील तीन दिवसांपासून त्यांनी मतदारसंघातील विविध गावांमध्ये गावभेटी आणि सभांचा धडाका लावला आहे. त्यांच्या या सभांना त्या त्या भागातील कार्यकर्ते ग्रामस्थ यांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.
आज गुरुवारी सकाळी आठ ते 11 या वेळेत चिणके गावात दौरा करतील. सकाळी नऊ ते बारा या वेळेत वझरे, सकाळी दहा ते एक या वेळेत अनकढाळ, सकाळी 11 ते 2 या वेळेत राजुरी, दुपारी बारा ते तीन वेळेत हटकर मंगेवाडी, दुपारी एक ते चार यावेळी हातीद,
दुपारी दोन ते पाच या वेळेत जुजारपूर, दुपारी तीन ते सहा या वेळेत गुनापवाडी, दुपारी चार ते सात या वेळेत जुनोनी, सायंकाळी पाच ते आठ या वेळेत पाचेगाव खुर्द, सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत चोपडी, संध्याकाळी सात ते दहा या वेळेत नाझरा या गावांमध्ये त्यांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या बारा गावातील दौऱ्यांची जयत तयारी करण्यात आली आहे या दौऱ्यामध्ये महायुती मित्र पक्षांचे नेते मंडळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.