सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. या प्रचाराच्या अगदी सुरुवातीलाच घराणेशाही, उपकार, भूमिपुत्र, अवैद्ध धंदे, गुंडगिरी, दबावशाही असे मुद्दे प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून जोरात मांडले जात असतानाच विद्यमान आमदार शहाजीबापू यांच्याकडे 5000 कोटींच्या निधीच्या माध्यमातून साधलेली शेकडो विकास कामे हाच “प्लस पॉईंट” असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अर्थात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील, शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीचे अधिकृत उमेदवार शहाजीबापू पाटील आणि महाविकास आघाडी इंडिया, इंडिया अलाईंन्स पुरस्कृत शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख या तिघांसह एकूण 13 उमेदवारांमध्ये सांगोला विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ सर्व उमेदवारांकडून फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांनी आलेगाव येथे सिद्धनाथाच्या साक्षीने प्रचाराच्या रणधुमाळीचा नारळ फोडला, तर दुसरीकडे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सांगोला शहरातील अंबिका देवीच्या साक्षीने प्रचाराचा नारळ फोडला. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज होत आहे.
पाण्याचा मुद्दा मागे पडला
मागील अनेक पंचवार्षिक निवडणुकांमध्ये सांगोल्याच्या पाण्याचा प्रश्न हा प्रचाराच्या केंद्रस्थानी होता. मात्र यंदा प्रथमच या निवडणुकीत सांगोल्याच्या पाण्याचा मुद्दा, दुष्काळाचा मुद्दा किंवा पर्यायाने सांगोल्याच्या विकासाचा मुद्दा मागे पडला असल्याचे दिसून येत आहे.
विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी मागील पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात सांगोला तालुक्यात तब्बल पाच हजार कोटींची विकास कामे केली आहेत.
दीपक आबा साळुंखे पाटील यांनी मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यावेळचे शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना मदत केल्याचा आणि उपकार केल्याचा मुद्दा लावून धरला आहे. “आमच्या मित्राने शब्द पाळला नाही, केलेल्या मदतीची जाणीव ठेवली नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी जाणीव ठेवली” असे म्हणत शहाजी बापूंवर संधान साधले आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख हे “शिवसेनेने दिलेला उमेदवार हा शिवसेनेचाच उमेदवार पाडण्यासाठी उभा केला आहे ” असा पलटवार केला आहे.
शेकाप आणि शिवसेना ऊबाठा गटाकडून अद्याप तरी पाण्याचा मुद्दा प्रचारात समोर आल्याचे दिसत नाही.
पाच हजार कोटींचा विकास हाच “स्ट्रॉंग पॉईंट”
विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी मागील पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात सांगोला तालुक्यात तब्बल पाच हजार कोटींची विकास कामे केली आहेत. या मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद गटांमध्ये त्यांनी भरघोस निधी आणून अनेक नवीन विकास कामे केले आहेत. अनेक वर्षांपासूनचे गाव खेड्यातील प्रश्न या विकास कामांच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. सांगोला शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य आणि प्रशस्त स्मारक, सांगोला शहरात भव्य असे ईदगाह मैदान, ट्रॉमा सेंटर, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प असे अशी अनेक विकास कामे केली आहेत. यातील बरीचशी कामे मार्गे लागली आहेत. काही कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
येत्या दोन दिवसांत शहाजीबापू यांच्या प्रचार सभेसाठी राज्यातील प्रसिद्ध स्टार प्रचारक नेते सांगोला शहरात दाखल होत आहेत.
सर्व जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये त्यांनी पक्के सिमेंटचे रस्ते, पेविंग ब्लॉक, हायमास्ट दिवे, समाज मंदिरे, साठवण तलाव, मंदिरांचे सुशोभीकरण, गार्डन, पशुसंवर्धन दवाखान्याचा विकास, पिण्याची पाण्याची सोय, आरोग्य व्यवस्था आदी विविध प्रकारची विकास कामे केली आहेत. मागील 55 वर्षात जेवढी विकास कामे केली नाहीत किंवा झाली नाहीत ती विकास कामे फक्त पाच वर्षात केली असल्याचा अत्यंत स्ट्रॉंग पॉईंट शहाजीबापूकडे आहे. या विकासाच्या मुद्द्यावरच शहाजीबापू हे जनतेपुढे जाऊन जनतेची मने वळवतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून मानण्यात येत आहे.
येत्या दोन दिवसांत शहाजीबापू यांच्या प्रचार सभेसाठी राज्यातील प्रसिद्ध स्टार प्रचारक नेते सांगोला शहरात दाखल होत आहेत.