सांगोला : विशेष प्रतिनिधी
तालुक्याच्या सर्वांगीण विकासात जनताच दैवत आहे. माझी राजकीय जीवनातील शेवटची निवडणूक असून आगामी पाच वर्षाच्या काळात तालुक्यासाठी मोठी एमआयडीसी, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, व्यावसायिक कॉलेज तसेच मोठमोठ्या कंपन्या तालुक्यात आणून तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण करायचे आहे. येत्या वर्षभरात तालुक्यात नंदनवन होणार आहे. मतदारांनी आपले पवित्र मत देऊन पाच वर्षे पुन्हा सेवा करण्याची संधी द्यावी. विजयाचा गुलाल हा आपलाच आहे. राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर येईल व मला मंत्रीपदाची संधी मिळेल. अशी ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील राजापूर, मेडशिंगी, आलेगाव, वाकी( घेरडी )वाणीचिंचाळे, पारे, डिकसळ, नराळे,घेरडी, हंगिरगे, वाढेगाव येथे प्रचारसभा झाल्या. त्यावेळी ते बोलत होते.
शहाजीबापू पाटील म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने सांगोला तालुक्याच्या विकासासाठी 5 हजार कोटीहून अधिक निधी दिल्याने गेल्या पाच वर्षात तालुक्यातील शेतीच्या व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात मोठे यश आले.
पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले , तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी व बेरोजगारी संपवण्यासाठी एमआयडीसी आणण्याचे नियोजन आहे. मतदारसंघातील उरलेले काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा एक वेळ संधी द्या. तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी माझी राजकीय लढाई होती. तालुक्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित ठेवले नाही. पाणीदार आमदार म्हणून माझी तालुक्यामध्ये ओळख निर्माण झाली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत ,माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, ॲड. बंडु काशीद ,भीमशक्ती संघटनेचे विजय बनसोडे, दीपक ऐवळे, शंकर दुधाळ ,उपजिल्हाप्रमुख दीपक दिघे, ओंकार शिंदे, तानाजी बाबर, पंकज काटे, माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार ,ॲड.महादेव कांबळे, यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ गावभेट दौऱ्यादरम्यान मनोगत व्यक्त केले .त्यांनी सांगितले की बापूंनी सांगोला तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.विरोधकांनी त्यांच्या सहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात कोणते काम केले ते जनतेसमोर सांगावे. या स्वार्थीपणाला जनता माफ करणार नाही. असे स्पष्ट करीत महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण केले.बापूंनी 35 वर्षे पाण्यासाठी व तालुक्याच्या विकासासाठी संघर्ष केला.
स्व. आमदार गणपतराव देशमुख यांनी तालुक्यात कोणतेच मोठे भरिव काम केले. शहाजीबापू पाटील यांना निवडून देऊन तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संधी देऊया .आमदार झाल्यानंतर बापू महायुती शासनामध्ये निश्चितपणे नामदार होतील. बापूंनी तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रात्रीचा दिवस करून 5 हजार कोटीहून अधिक निधी खेचून आणला .गेल्या 55 वर्षात स्व.गणपतराव देशमुख यांनी पाण्यासाठी संघर्ष ही फाईल पुढे सरकवण्याचे धाडस केले नाही. परंतु गेल्या पाच वर्षाच्या काळात तालुक्यातील शेतीच्या व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आमदार शहाजीबापू पाटील यशस्वी झाले. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचार सभेसाठी प्रत्येक गावातून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी प्रचार सभेसाठी, वैजिनाथकाका घोंगडे ,माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार ,भाजपचे ज्येष्ठनेते शिवाजीअण्णा गायकवाड, भाजपचे ज्येष्ठ नेते शशिकांतभाऊ देशमुख, युवा सेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील, शिवसेनेचे नेते अभिजीत नलवडे, विधानसभा प्रमुख प्रा.संजय देशमुख, मधुकर करे दिलीप सावंत जिल्हा उपप्रमुख जगदीश पाटील, भगवान कदम, चंद्रकांत पाटील ,मेडशिंगीचे माजी सरपंच संजयनाना रुपनर, भारत इंगवले सर, रामलिंग झाडबुके, विठ्ठलदादा बाबर, अशोक दिघे ,रामहरी नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर सभेप्रसंगी मोठ्या संख्येने समुदाय उपस्थित होता .यावेळी तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी तालुक्यात नवनवीन उद्योगधंदे व मोठी एमआयडीसी आणण्याचा संकल्प आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला. जो उमेदवार भविष्यात तालुक्याचा विकास करू शकतो अशा उमेदवाराला आपण संधी द्यावी. एक वेळ निवडून द्या तालुक्याचा, चौफेर विकास पाहायला मिळेल. माझ्या कष्टाला न्याय देऊन विकास करण्याची पुन्हा एकदा संधी द्या असे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मतदारांना आवाहन केले.
सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे, घेण्यात आलेल्या कॉर्नर सभेसाठी प्रचंड प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. आमदार शहाजीबापू पाटील यांना आपली ताकद द्या .बापूंनी सर्व समाजाला न्याय दिला आहे. आजारपणात बापूंना तालुक्याच्या विकासाची चिंता होती. मुख्यमंत्री भेटायला आल्यानंतर 16 गावांना उजनीचे पाणी द्या. ती फाईल मंजूर करा अशी मागणी केली.
सांगोला तालुक्यातील नराळे ,हंगिरगे, डिकसळ, वाढेगाव येथे उबाठा व शेतकरी कामगार पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश केला व आमदार शहाजीबापू पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. वाढेगावची भूमी पवित्र असून आमदार शहाजीबापू पाटील यांचा विजय निश्चित आहे. स्व. आमदार गणपतराव देशमुख आज असते तर त्यांनीही बापूंच्या कामाची प्रशंसा केली असती एवढे प्रचंड काम बापूंनी उभा केले.