खा. संजय राऊत यांना सांगोल्यात येवू देणार नाही!
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांचा इशारा
सांगोला : विशेष प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीवर भाष्य करताना शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जावून टीका केली आहे. संजय राऊत यांचे हे वक्तव्य तमाम आंबेडकरी समाजाच्या अस्मितेवर घाला घालणारे आहे. समाजाचा अपमान करणारे आहे. संजय राऊत यांनी देशातील तमाम आंबेडकरी समाजाची माफी मागावी.. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांना सांगोला शहर किंवा तालुक्यात पाऊल ठेवू देणार नाही. आंबेडकरी समाजाला घेऊन त्यांच्या विरोधात उग्र आंदोलन करू, असा इशारा बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
बापूसाहेब ठोकळे म्हणाले की, आम्ही भारत मुक्ती मोर्चा, बामसेफ किंवा इतर समविचारी चळवळीत काम करत असताना आंबेडकर घराण्याच्या बाजूने उभा राहत आलो आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा निवडणूक लढवत असताना त्यांना सांगोला शहर आणि तालुक्यातून दोन लाखाहून अधिक रकमेची थैली निवडणूक निधी म्हणून समाजाच्या वतीने सुपूर्त केली होती.
शिवसेना पक्ष हा सातत्याने आंबेडकरी समाजाचा द्वेष करत आला आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास शिवसेनेचा विरोध होता. हा त्यांचा काळा इतिहास आंबेडकरी समाज विसरला नाही. संजय राऊत यांनी आंबेडकरी समाजाची तातडीने जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या सभा उधळून लावल्या जातील असा इशारा बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
मागील महिन्यात ते सांगोला येथे ओबीसी आरक्षण बचाव रॅली निमित्त आले असता त्यांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशावर खूप मोठे उपकार आहेत. त्यांच्या घरातील व्यक्तीवर बोलण्याची किंवा टीका करण्याची कुणाही राजकीय नेत्याची लायकी नाही. स्वतःची वैचारिक कुवत नसताना खा. संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जावून आंबेडकरी विचारांच्या द्वेषातून टीका केली आहे. ही टीका तमाम आंबेडकरी समाजाचा अपमान करणारी आहे.
राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना करारा जवाब देऊ
खासदार संजय राऊत यांनी केलेली टीका ही तमाम आंबेडकरी समाजाच्या अस्मितेवर घाला घालणारी आहे. प्रकाश आंबेडकर हे दवाखान्यात ऑपरेशनसाठी उपचार घेत असताना त्यांना हिनवणे हे शिवसेना पक्षाला शोभणारे नाही. शिवसेना पक्ष हा सातत्याने आंबेडकरी समाजाचा द्वेष करत आला आहे.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास शिवसेनेचा विरोध होता. हा त्यांचा काळा इतिहास आंबेडकरी समाज विसरला नाही. संजय राऊत यांनी आंबेडकरी समाजाची तातडीने जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या सभा उधळून लावल्या जातील असा इशारा बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
“आंबेडकर साहेबांनी भ्रम निर्माण करणारी वक्तव्य ICU मधून करू नये. त्यांनी जास्त बोलू नये. त्यांनी आधी आपली प्रकृती सांभाळावी. महाराष्ट्र आम्ही सांभाळतो,”अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल केला होता. या त्यांच्या वक्तव्यामुळे आंबेडकरी चळवळीत संतापाची लाट उसळली आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते आयसीयुमध्ये असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत की, “यंदाची ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा. दुसऱ्या बाजूला एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा,” असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.