सांगोला/ विशेष प्रतिनिधी
निवडणुकीचा ज्वर वाढलेला आहे. जो तो आणाभाका देत मीच म्हणजे अख्खा तालुका अशी बतावणी मारीत, साठीत ही नाटी बुद्धीचा खेळ करीत आहेत. पण याच निवडणुकीच्या आधी याच लोकांनी घात केला होता. तरुणांनी ही माणसे ओळखावीत. हेच तरुण क्रांती घडवू शकतात, असे मत खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन तुकाराम भूसनर यांनी मांडले.
पत्रकारांशी बोलताना भूसनर म्हणाले की,
सांगोला विधानसभेचा रणसंग्राम तिरंगी अवस्थेत पोहचला आहे. त्यामुळे येथील आमदारकी प्रतिष्ठेची होणार आहे. त्यात शेकापचे बाबासाहेब देशमुख हेच बाजी मारणार आहेत. दरम्यानच्या काळात ज्यांना काही भरभरून दिलं, कसं का असेना. आमदार केलं, कुटुंबियातील व्यक्तींना जिल्ह्यात पद दिली. त्यांचं काय योगदान तालुक्यासाठी. त्यांची संस्कृती, वागणं,बोलणं कसं आहे? याही गोष्टीचाची जरूर विचार करा. आजही ५५ वर्षाच्या महान कार्यावर ते त्यांचे बगलबच्चे टीका टिप्पणी करीत आहेत. पण याच बोलबच्चनगिरी करणाऱ्या नेत्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा इतिहास सर्वानाच माहित आहे.
म्हणे आमदार झाल्यावाणी वाटतंय….असो त्यांच्या कार्याला शुभेछ्या…पण हीच बेडकी फुगून बैल होण्याचा विचार करत होती, तेही ठीक होत. या बेडकीला हत्ती होण्याचं स्वप्न पडलय की काय?
सांगोला तालुक्याला थोर असा वारसा लाभलेला आहे. पण मागील पाच वर्षात काय होती तालुक्याची अवस्था? कसा चालला होता कारभार? यात आपणास बदल घडवावयाचा आहे. त्यामुळे कोणीही घाबरायचे नाही. निर्भयपणे मतदान करावे. कालच आमच्या घेरडी गटातील शेकडो बहाद्दर कार्य कर्त्यानी डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला. हीच आमच्या कामाची पद्धत.
याच वेळी पुढे बोलताना भुसनर म्हणाले की स्व.आबासाहेब असताना काहीना सामावून घेतले. त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य संस्थांमध्ये वाटा दिला पण त्यांच्या बगलबच्यानी केली का मदत? आमदारकीच्या वेळेही साथ दिली नाही.त्यामुळे सर्वांनीच लक्षात घ्यावे. ही लढाई विचाराची आहे.तालुक्याच्या विकासाची आहे. डॉ.बाबसाहेब देशमुख सारख्या तरुण तडफदार नेतृत्वाला विधानसभेत पाठवावयाचे आहे.