सांगोला/ नाना हालंगडे
253 सांगोला विधानसभा मतदारसंघ एकूण 32 व उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते. पैकी आज दिनांक 4/11/24 रोजी एकुण 19 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे, तहसीलदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत अर्ज माघारी घेण्यात आल्याचे माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली.
खालील उमेदवाराने अर्ज माघारी घेतलेले आहेत त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत
1)राजरत्न जनार्दन गडहिरे लोटेवाडी -अपक्ष 2)संजय वसंत पाटील जैनवाडी- अपक्ष 3)सोमा गुलाब मोटे घेरडी -राष्ट्रीय समाज पक्ष 4)अनिल बाळासो शेंडगे शिरभावी- राष्ट्रीय समाज पक्ष5) हरिश्चंद्र विठोबा चौगुले बामणी- अपक्ष 6)संग्रामसिंह नेताजी पाटील लक्ष्मी टाकळी -अपक्ष 7)किरण तानाजी साठे अकलूज -अपक्ष 8)दत्तात्रेय राजकुमार टापरे कडलास- अपक्ष 9)धरती अतुल पवार मेथवडे -अपक्ष 10)उमेश ज्ञानू मंडले सांगोला –
अपक्ष 11)मारुती दगडू जाधव पळशी- महाराष्ट्र राज्य समिती 12)विनोद बाबुराव बाबर सांगोला- अपक्ष 13)संजय बिरु हाके काळूबाळूवाडी -अपक्ष 14)गोविंद अंबादास कोरे सांगोला -अपक्ष 15)डॉक्टर अनिकेत चंद्रकांत देशमुख सांगोला – अपक्ष 16)सुदर्शन मुरलीधर घेरडे किडबिसरी- बळीराजा पार्टी
17) अतुल प्रभाकर पवार मेथवडे- अपक्ष 18)हरिदास बापूसो वाळके (यादव) आलेगाव -अपक्ष
19) धनाजी दत्तात्रय पारेकर चोपडी- स्वराज्य निर्माण सेना या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याचे मिडीया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे.