ताजे अपडेट
Trending

कुशल कर्मचाऱ्यांना मारावा लागतो झाडू

सांगोला आगारात माणुसकीहिन प्रकार

Spread the love

हे काम स्वच्छक पदावरील कामगारांचे आहे. मात्र हे पद मागील दोन वर्षांपासून रिक्त आहे. या रिक्त पदावर कायमस्वरूपी कामगार नेमून त्याच्याकरवी काम करून घेणे अपेक्षित असताना वर्क शॉप मधील कुशल यांत्रिक कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ्ता करून घेण्यात येते. भल्या सकाळी दहा ते पंधरा कुशल यांत्रिक कर्मचारी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करून घेतात.

सांगोला / नाना हालंगडे
सांगोला एसटी आगारातून आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुशल कर्मचाऱ्यांनाच चक्क हातात झाडू घेऊन वर्कशॉप आणि समोरील परिसर स्वच्छ करावा लागतो. मागील दोन वर्षांपासून बिनबोभाटपणे हा प्रकार सुरू आहे. इच्छा नसतानाही केवळ आगार प्रमुखांच्या दबावापोटी येथील वर्कशॉपमधील कुशल कामगार भल्या सकाळी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करतात.

वास्तविक पाहता हे काम स्वच्छक पदावरील कामगारांचे आहे. मात्र हे पद मागील दोन वर्षांपासून रिक्त आहे. या रिक्त पदावर कायमस्वरूपी कामगार नेमून त्याच्याकरवी काम करून घेणे अपेक्षित असताना वर्क शॉप मधील कुशल यांत्रिक कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ्ता करून घेण्यात येते. भल्या सकाळी दहा ते पंधरा कुशल यांत्रिक कर्मचारी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करून घेतात.

सांगोला आगारात सर्वत्रच बोंबाबोंब असून गाड्याच्या कामगिरीने तर कहरच केला. त्यात भरीलाभर आगारातील वर्कशॉप विभागातील तसेच अन्य परिसर स्वच्छ करण्यासाठी येथील कुशल कामगार लोकांना हातात झाडू घेवून स्वच्छता करावी लागत आहे.

सांगोला आगार हे समस्यांचे आगार बनले असून प्रमुखाला याचे काहीच देणेघेणे नाही. सकाळी निवांत ११ वाजता हजेरी लावून, लावलिजाम कामगिरी करणारे हे महाशय अक्षारशा गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे बघत नाहीत. वेळापत्रकाप्रमाणे ग्रामीण भागात नियोजन करीत नाहीत. त्यामुळे तालुकावासियांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

सांगोला आगाराचे क्षेत्रफळ हे विस्ताराने खूपच मोठे आहे. रोज दैनंदीन गाड्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात येणाऱ्या वर्क शॉप विभागात चक्क येथील कुशल यांत्रिक कर्मचाऱ्यांना झाडू मारून गाड्यांच्या कामांना सुरुवात करावी लागत आहे.

पद का भरले जात नाही?
वर्क शॉप विभागातील स्वच्छ्ता करण्यासाठी स्वच्छक कर्मचारी हे पद पूर्वी येथे कार्यरत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी या पदावरील कामगार सेवानिवृत्त झाला. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. या पदावर कामगार भरती करून घेणे हे आगार प्रमुखाचे काम आहे. मात्र यासाठी सध्याच्या तसेच यापूर्वीच्या आगार प्रमुखांनी प्रयत्न केले नाहीत. पद रिक्त झाल्याने त्याचे काम वर्क शॉप मध्ये कार्यरत असणाऱ्या कुशल यांत्रिक कर्मचाऱ्यांना करावे लागले. ही लाजिरवाणी बाब आहे.

थिंक टँकचे सवाल

  • कुशल यांत्रिक कर्मचाऱ्यांना झाडू मारायला लावणे हे कोणत्या नियमात बसते?
  • स्वच्छक हे पद का भरण्यात येत नाही?
  • यांत्रिक कामासाठी नेमणूक असणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांना झाडू मारायला लावणे ही त्यांच्या अधिकारावर गदा नाही का?
  • हा प्रकार किती दिवस चालणार?
  • तालुक्याचे राजकारण करणाऱ्या नेतेमंडळींना या आगारात चालणाऱ्या माणुसकीहिन प्रकारचे काही देणे घेणे नाही का?
  • कुशल यांत्रिक कामगारांना अशा कामांना जंपल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही का?

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका