सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला आगारातून सकाळी 6 वाजता सुटणाऱ्या सांगोला-पुणे या गाडीचा चालक आज सकाळी सकाळीच तर्र झाल्याने जागरून प्रवाशांनी पोलिसात तक्रार केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. ही बस सांगोला पोलिसात दाखल केलेली आहे. जर या दारुड्या चालकाने नशेत तशीच बस पुण्याला नेली असती तर नक्कीच मोठा अनर्थ घडला असता. जागरूक प्रवाशांनी तातडीने अशा बेवड्या चालकाला ओळखून बस रोखून धरली. ही सदरची घटना आज सोमवार, 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी घडली आहे
याबाबत माहिती अशी की, सांगोला आगारातून पुण्यासाठी दिवसभर 12 गाड्या आहेत. पहिलीच गाडी सकाळी 6 वाजता असते. हीच गाडी 6 वाजता सांगोला आगारातून निघाली असता चालक पाटील दारू पिऊन तर्र अवस्थेत दिसला. गाडी कशीही चालवीत होता. हीच विठाई गाडी एम एच_12, 6897 ही गाडी होती.
यावेळी सांगोला येथील अंबिका मंदिराजवळ हा प्रकार निदर्शनास आल्याने तात्काळ पोलिसांना बोलावून चालक उत्तम पाटील याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
आज सकाळी सकाळी गाडी पुण्याला जात असताना चालक कसा तर्र झाला होता. ही बाब वाहतूक निरीक्षक,वाहतूक नियंत्रक व चौकशी कक्षातील अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही. जर का जा प्रवश्यानी तक्रार केली नसती तर मोठी घडली असती.
सांगोला आगारात कोणाचाच कोणाला मेळ नाही. योग्य नियोजन नाही. तर आगार प्रमुखाचे योग्य नियंत्रण नसल्याने कनिष्ठ अधिकारीही मनमानी प्रमाणे वागत आहेत. वाहतूक निरीक्षकही वेळेवर येत नाही. तर वाहतूक स्थानिक असल्याने योग्य नियोजन करीत नाहीत. या पूर्वीही अश्या घटना दोन वेळा घडलेल्या आहेत.
आगारातील कोणत्याही एसटी बसेचे वेळापत्रक नाही.आज ही तालुक्यातील प्रवाश्यांना नियमित सेवा मिळत नाही. ही आजची घटना लाजिरवाणी अशीच आहे.