सांगोला : थिंक टँक न्यूज नेटवर्क
शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.
आमदार शहाजीबापू पाटील हे प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. 1995 साली विधानसभा निवडणुकीत केवळ भाषणाच्या जोरावर त्यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांचा पराभव केला होता. त्यावेळेस ते शिवसेना पक्षाकडून लढले होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाई गणपतराव देशमुख यांनी स्वतः निवडणूक लढवणार नाही असे घोषित करून नातू डॉ. अनिकेत देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत अत्यंत अल्प मताने शहाजीबापू पाटील हे निवडून आले.
तिरंगी सामना रंगणार
शेतकरी कामगार पक्षाकडून डॉ. बाबासाहेब देशमुख, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील हे तिघेजण रिंगणात असल्याने तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.