ताजे अपडेट
Trending

सांगोल्याचा क्राईम रेट शंभरी पार

तालुक्यासाठी चिंताजनक बातमी

Spread the love

सांगोला शहर व तालुक्यात दिवसेंदिवस चोऱ्या, खून, मारामारी, भांडण तंटा भाग-५ चे गुन्ह्यांसह गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताण कमी व्हावा, गुन्ह्याचा तपास जलद गतीने व्हावा व नागरिकांना वेळेत मदत मिळावी या दृष्टीने सांगोला पोलीस स्टेशनचे विभाजन करून नाझरे- कोळे मिळून ३५ गावांसाठी हातीद येथे तर २२ गावांसाठी महूद या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करावी, यासाठी सांगोला पोलीस स्टेशनकडून पोलीस अधीक्षक सोलापूर ( ग्रामीण ) यांना वारंवार प्रस्ताव पाठवून दिले आहेत. परंतु मागील अनेक वर्षांपासून नवीन पोलीस स्टेशनचे प्रस्ताव मंजुरी अभावी शासन दरबारी धुळखात पडून आहेत. आजी- माजी लोकप्रतिनिधी लक्ष्य घालून नवीन पोलीस स्टेशनच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. हे सारे विदारक चित्र असल्याने तालुक्याचा क्राईम रेट शंभरी पार झालेला आहे.

सांगोला तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असून सांगोला शहरासह तालुक्याची लोकसंख्या सुमारे ३ लाख ४० हजारावर पोहचली आहे. तर दुसरीकडे सांगोला तालुक्यातील १०३ गावांसाठी एकच पोलीस स्टेशन कार्यरत आहे. वास्तविक लोकसंख्येचा विचार घेता सांगोला शहर व तालुक्यासाठी आजमितीला आणखी दोन पोलीस स्टेशनची अत्यंत गरज आहे.

सांगोला पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी बदलून गेले आणि नवीन अधिकारी आल्यानंतर पोलीस स्टेशनचा क्राईम रेट पाहून नवीन पोलीस स्टेशन निर्मितीचे प्रस्ताव पाठवतात. परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून फारशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे सांगोला पोलीस स्टेशनचे विभाजन होऊन नवीन पोलीस स्टेशन निर्मितीचे अनेक वर्षापासूनचे घोंगडे भिजत पडले आहे.

सांगोला शहर व तालुक्यात दिवसेंदिवस चोऱ्या, खून, मारामारी, भांडण तंटा भाग-५ चे गुन्ह्यांसह गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सन २०२४ मध्ये सांगोला पोलीस स्टेशनचा वार्षिक क्राइम रेट १००३ पर्यंत पोहचला आहे. तसेच सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील सोलापूर -सांगली जत – इंदापूर , सांगोला -पंढरपूर व पंढरपूर -कराड रोडवर वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यामुळे या रोडवर दररोज कोठे ना कोठेतरी अपघाताच्या घटना घडतात. अशावेळी सांगोला पोलीस स्टेशन येथून अपघात स्थळी पोहचून अपघातग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब लागतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून एकाच पोलीस स्टेशनवर १०३ गावांचा कारभार सुरू आहे. महूद जुनोनी घेरडी येथे नवीन पोलीस स्टेशनची निर्मितीसाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी २१ डिसेंबर २०१८ रोजी व तात्कालीन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी ७ जानेवारी २०१९ रोजी सोलापूर पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना प्रस्ताव पाठवले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून एकाच पोलीस स्टेशनवर १०३ गावांचा कारभार सुरू आहे.

सांगोला पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी बदलून गेले आणि नवीन अधिकारी आल्यानंतर पोलीस स्टेशनचा क्राईम रेट पाहून नवीन पोलीस स्टेशन निर्मितीचे प्रस्ताव पाठवतात. परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून फारशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे सांगोला पोलीस स्टेशनचे विभाजन होऊन नवीन पोलीस स्टेशन निर्मितीचे अनेक वर्षापासूनचे घोंगडे भिजत पडले आहे.

वाढत्या गुन्हेगारीच्या दृष्टीने नाझरे -कोळे मिळून हातीद येथे कोळे, जुनोनी, जुजारपूर, तिप्पेहळी, गौडवाडी, सोमेवाडी, बुद्धेहाळ, पाचेगाव बु, किडेबिसरी, हातीद, हटकर मंगेवाडी, गुणापवाडी, कारंडेवाडी, कोंबडवाडी ,काळूबाळूवाडी ,सरगरवाडी, पाचेगाव खुर्द ,राजुरी ,करांडेवाडी ,चोपडी, करांडेवाडी ,मानेगाव, डोंगरगाव, नाझरे, बलवडी, चिणके ,वाटंबरे ,अनकढाळ, वझरे, बंडगरवाडी, नलवडे वस्ती, मिसाळवाडी आणि झापाचीवाडी अशा ३५ गावांसाठी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करावी म्हणून तत्कालीन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सन २०२४ मध्ये प्रस्ताव पाठवला असून त्यावरही अद्याप निर्णय नाही.

संवेदनशील महूद येथे २२ गावांसाठी पोलीस स्टेशनची निर्मिती करिता कटफळ, इटकी, चिकमहुद, गायगव्हाण, खिलारवाडी, लोटेवाडी आचकदाणी, बागलवाडी, वाकी शिवणे, सोनलवाडी, खवासपूर, हलदहिवाडी, महिम, लक्ष्मीनगर, नवी लोटेवाडी( सातारकरवस्ती) ,नरळेवाडी ,जाधववाडी ,बंडगरवाडी ,कारंडेवाडी, ढाळेवाडी अशा २२ गावांसाठी ५ फेब्रुवारी २०२४ रोजी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करिता प्रस्ताव पाठवले आहेत मात्र अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका