सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील शालेय विद्यार्थिनी व महिलांची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओचा बंदोबस्त करण्यात यावा, तालुक्यातील गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात यासंदर्भात सांगोला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकर यांची भेट घेऊन कार्यवाही करण्याची पत्राद्वारे मागणी केली.
यावेळी सांगोला तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, चोऱ्यांचे वाढते प्रमाण व अमली पदार्थ तस्करी यासंदर्भात स्वतः लक्ष घालण्याची विनंती पोलीस अधीक्षक यांना तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी केली.
सांगोला शहरातील बस स्थानक व महाविद्यालय परिसरात निर्भया पथकाची जास्तीत जास्त तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी Ad.SP मा.यावलकर यांनी दिल्या. लवकरच सांगोला पोलीस स्टेशन अंकित महूद बिट मधील चोऱ्या चे तपास किती पूर्ण झाले यांची माहिती मी स्वतः सांगोला पोलीस ठाणे येथे भेट देऊन घेईन, असा विश्वास पोलीस अधीक्षक (SP) अतुलजी कुलकर्णी यांनी यावेळी तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांना दिला.
निवडणुकीत गाजला होता रोडरोमिओंचा मुद्दा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोला तालुक्यातील रोडरोमिओंचा मुद्दा चांगलाच गाजला होता. हा मुद्दा प्रचाराचा मुद्दा बनला होता. या मुद्द्याला धरून मते मागण्यात आली. निवडणूक संपून दोन महिने होत आहेत. असे असताना या मुद्द्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अवैध धंदेही हळूहळू जोर धरताना दिसत आहेत.