
सांगोला : विशेष प्रतिनिधी
2019 साली आमदार झाल्यापासून शहाजीबापू पाटील यांनी कामाचा धडाका लावला आहे. मोडकळीस आलेली सांगोला नगर परिषदेची इमारत पाडून त्या जागी भव्य अशी पाच मजली प्रशासकीय इमारत बांधण्यात येत आहे. ही इमारत जणू अमेरिकेतल्या वाईट हाऊस सारखी साकारण्यात येणार आहे.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून तसेच आदर्श प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून नागरिकांचा वेळ वाचावा या हेतूने सांगोला नगरपरिषदेची नवीन भव्य आणि आकर्षक प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या इमारतीमध्ये जनरेटर बॅक अप सह दोन लिफ्ट असतील. या इमारतीमध्ये 150 लोक बसतील एवढ्या आसन क्षमतेचे सुसज्ज सभागृह असेल.
सांगोला नगरपरिषदेच्या या भव्य अशा नवीन इमारतीसाठी महाराष्ट्र शासनाने 15 कोटींचा निधी मंजूर केला आहे. याची निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे. हा निधी मंजूर करण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोठे प्रयत्न केले आहेत.
या नवीन इमारतीची खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे
या नवीन इमारतीचे बांधकाम क्लासिक स्टाईलचे होणार आहे. ही इमारत पाच मजली बांधण्यात येणार आहे. या इमारतीचे बांधकाम क्षेत्र 6877.09 स्क्वेअर मीटर एवढे असणार आहे. या इमारतीमध्ये 302 दुचाकी आणि 26 चारचाकी वाहने बसतील एवढे मोठे पार्किंग असणार आहे.
या इमारतीमध्ये जनरेटर बॅक अप सह दोन लिफ्ट असतील. या इमारतीमध्ये 150 लोक बसतील एवढ्या आसन क्षमतेचे सुसज्ज सभागृह असेल.
ही इमारत कार्यान्वित होताच सांगोला शहरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.