ताजे अपडेट
Trending

सांगोला येथे जयकर मागाडे आणि जगदीश मागाडे यांच्या सत्काराचे आयोजन

Spread the love

जयकर मागाडे यांनी सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून त्यांना नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

सांगोला : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते जयकर मागाडे यांचा तसेच वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध साहित्यिक जगदीश मागाडे यांच्या सत्काराचे आयोजन सांगोला येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, १४ डिसेंबर रोजी सांगोला येथील हॉटेल फाईव्ह स्टार येथे दुपारी चार वाजता होईल.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील वाघमारे (अध्यक्ष : फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, पंढरपूर) असतील. प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब बनसोडे (संघटक सचिव – आरपीआय मुंबई प्रदेश), बापूसाहेब ठोकळे (बहुजन नेते, सांगोला), राजेंद्र खरात (आरपीआय नेते आटपाडी), खंडू सातपुते (आरपीआय सांगोला तालुकाध्यक्ष), लक्ष्मण गायकवाड (आरपीआय नेते मंगळवेढा), साबळे गुरुजी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त), प्रभाकर कसबे गुरुजी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त), तानाजी चंदनशिवे (माजी उपसभापती, पं. स. सांगोला), बा. ना. धांडोरे (ज्येष्ठ साहित्यिक), शहाजी गडहिरे (अध्यक्ष – अस्तित्व संस्था, सांगोला), लक्ष्मण घनसरवाड (अध्यक्ष भटके विमुक्त संघटना महाराष्ट्र राज्य), विजय बनसोडे (अध्यक्ष : भीमशक्ती संघटना), मच्छिंद्र भोसले (सामाजिक कार्यकर्ते), डॉ. बाळकृष्ण मागाडे, डॉ. बाळासाहेब मागाडे (पत्रकार) उपस्थित राहतील.

धम्मदेसना आणि गाथा पठण धम्मचारी ज्ञानसेन सांगली, धम्ममित्र नवनाथ मोरे हे पर पाडतील.

या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका