सांगोल्यात आमदारांच्या वचननाम्यालाच दिला धोका
६ आरोग्य केंद्रे अन् ४० उपकेंद्रे सलाईनवर ; आरोग्य सेवेचा बोजवारा
सांगोला/डॉ.नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील सहा आरोग्यवर्धीनी केंद्रे अन् ४० आरोग्य उपवर्धीनी केंद्रात नंगानाच सुरू आहे. कोणीच कोणाला जुमानत नाय अन् गरिबांना सेवा मिळत नाय, अशी अवस्था सांगोला तालुक्याची झाली आहे. नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी निवडणूक वचनाम्यात जो आरोग्याचा गहन प्रश्न उपस्थित केला होता. त्याला कालच तालुका आरोग्य अधिकाऱ्याने धोका दिला. त्यामुळे डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यासमोर तालुक्याची आरोग्यसेवा सुरळीत करण्याचे आव्हान आहे.
आज शासन लाखो रुपये खर्च आरोग्य सेवेवर करीत आहे. तर प्रत्येक आरोग्यवर्धीनी केंद्राला दोन आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, आरोग्य सेवक यांच्यासह मोठा लवजमा आहे. पण दुपारी १२ नंतर हीच केंद्रे अन् उपकेंद्रे कुलूपबंद असतात.
आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. आज केवळ तालुका वासियांना सेवाच मिळत नसल्याने ही केंद्रे सलाईनवर आहेत. नूतन आमदारापुढे अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे. आज तालुक्यात मोठे घबाड मिळते म्हणून, अधिकारी खोके मिळविण्यासाठी येतात. हे सर्वच शासकीय विभागात पहावयास मिळत आहे. अनेकजण गेली कित्येक वर्ष झाले खुर्चीला चिकटून आहेत. तालुक्यात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आरोग्य सेवेचा अक्षरशा बोजवारा उडालेला आहे. त्यातच भरीलाभर तालुका आरोग्य अधिकारीही तालुक्यांतीलच. त्यामुळे माझे कोण काय करते, हाच आविर्भाव. आज शासन लाखो रुपये खर्च आरोग्य सेवेवर करीत आहे. तर प्रत्येक आरोग्यवर्धीनी केंद्राला दोन आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, आरोग्य सेवक यांच्यासह मोठा लवजमा आहे. पण दुपारी १२ नंतर हीच केंद्रे अन् उपकेंद्रे कुलूपबंद असतात.
आजही गोरगरिबांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. आरोग्य उपकेंद्रात सुविधा मिळत नाहीत. यामध्ये अनेक मेडिकल ऑफिसर हे कंत्राटी आहेत. हे नुसतेच पगाराला गाठ घालतात. एका केंद्राला दोघे असल्याने यांचे ही केंद्रात येण्याचे दिवस ठरलेले आहेत. अशाने कशी सेवा मिळेल?
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी सौ. डॉ. निकिता देशमुख तालुक्यात एका आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसर होत्या. त्यांना हा सारा प्रकार माहीत आहे. आज केवळ तालुका आरोग्य अधिकारीच सांगकाम्या असल्याने हा सारा प्रकार होत आहे. त्यावरती नियंत्रण ठेवणारे गटविकास अधिकारी त्याहून अकार्यक्षम. मग तुम्हीच सांगा आमदाराने केलेला वचननामा कसा पूर्णत्वास जाईल? यासर्वांची डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी नसबंदी केली पाहिजे. तर तालुकावासियांना चांगली सेवा मिळेल. तसे होत नसेल तर तुमचा वचननामा तर काय कामाचा?
अधिकाऱ्याची चौकशी व्हावी : आनंदा यमगर
सांगोला तालुक्यातील सहा आरोग्य वर्धिनी केंद्रासाठी सहा रुग्णवाहिका मिळाल्या होत्या. त्याचे उद्धाघट काल करण्यात आले. प्रोटोकॉल नुसार आ. डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणे क्रमप्राप्त होते. पण तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश खांडेकर यांनीच हा प्रोटोकॉल पाळला नाही. त्यामुळे अशा या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी लावून घराचा रस्ता दाखविणार असल्याचे चेअरमन आनंदराव यमगर यांनी सांगितले.