“आबा, मशालीने गद्दारांच्या बुडाला चटके द्या”
पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं बळ
मुंबई : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यात शिवसेनेची ताकद आहे. मागील निवडणुकीत तेथे आमचा उमेदवार निवडून आला. मात्र त्याने गद्दारी केली. दीपकआबा साळुंखे यांच्या रूपाने एक ताकदवान नेता आम्हाला मिळाला आहे. आबा आज तुमच्या हातात शिवसेनेची मशाल देत आहे. या मशालीने काय करायचे ते तुम्ही ठरवा. मशालीने गद्दारांच्या बुडाला चटके द्या” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या हाती मशाल दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी आज शिवसेना उध्दव ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे स्वागत करताना उद्धव ठाकरे बोलत होते.
ठाकरे पुढे म्हणाले की, सांगोला हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी विजय सोपा नाही. कार्यकर्त्यांनी तुम्हाला काम करावे लागेल. मशाल चिन्ह घराघरांत पोहोचवावे लागेल.