सांगोला शहरात 200 कोटींहून अधिक निधीची विकासकामे
शहाजीबापूंच्या कार्याचा खणखणीत आलेख
सांगोला : विशेष प्रतिनिधी
आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला शहर आणि तालुक्याच्या विकास कामांसाठी पाच हजार कोटी रुपयांहून अधिक निधी खेचून आणला. मात्र विरोधकांकडून या निधीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. असे असले तरी शहाजीबापू पाटील यांनी शहर आणि तालुक्यात केलेली विकासकामे पाहता त्यांनी एवढा भरगच्च निधी आणल्याचे स्पष्ट होते. फक्त सांगोला शहरातच त्यांनी तब्बल 200 कोटी रुपयांहून अधिक रकमेची विकासकामे केली आहेत.
शहाजीबापूंनी सांगोला शहरात तब्बल 200 कोटींहून अधिक रकमेची विकास कामे केले आहेत. त्यामध्ये एकूण कामे 176 आहेत. त्यापैकी पूर्ण कामे 69 आहेत. सुरू असलेली कामे 92 आहेत. यापैकी फक्त पंधरा कामे प्रलंबित आहेत.
काही ठळक कामे
1. सांगोला नगरपरिषदेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाची कुंपण भिंत बांधकाम पूर्ण.
2. भीम नगर कट्टा सुशोभीकरण पूर्ण.
3. नगरपरिषदेकडील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण.
4. भीम नगर जिल्हा परिषद मराठी शाळा येथे पेविंग ब्लॉक बसविले व काँक्रीट कट्टा बांधला.
5. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन सुशोभीकरण केले.
6. चिंचोली रोड पाण्याची टाकी कुंपण भिंत व चौकीदार केबिन बांधकाम पूर्ण.
7. ढोले मळा ते मोरे मळा रस्ता खडीकरण व डांबरीकरण केले.
8. विजय गुजर ते मान नदीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण पूर्ण.
9. पुजारवाडी येथील सुधाकर आहेरकर घर ते दीपक शिंदे घर ते बाळू जाधव घर ते नंदू जाधव घर ते मारुती बनकर घर ते पुजारवाडी रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूने कॉंक्रीट गटार व रस्ता डांबरीकरण केले.
10. सांगोला शहरातील विविध अंतर्गत रस्ते व मुख्य बाजारपेठ रस्ते डांबरीकरण केले.
11. आरक्षण क्रमांक 25 येथील चौक सुशोभीकरण केले.
12. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जवळील इदगाह मैदान सुशोभीकरण केले व वॉल कंपाऊंड बांधकाम पूर्ण केले.
13. भीम नगर मराठी शाळा येथे पेविंग ब्लॉक टाकणे तसेच काँक्रिटीकरण कट्टा बांधकाम केले.
14. ताल वॉक ते भोकरे वस्ती ते सोमनाथ पैलवान मंगल कार्यालय ते उत्तम बुरांडे घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण केले.
15. चिंचोली रोड सर्वे नंबर 521 व 548 मधून पश्चिमेस सर्वे नंबर 548 हद्दीपर्यंत रस्ता केला.
16. देशमुख वस्ती ते प्रशांत देशमुख घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण केले.
17. एकतपुर रोड ते ईदगाह मैदान पर्यंत रस्ता डांबरीकरण केले.
18. चिंचोली रोड ते पश्चिमेस सर्वे नंबर 548 पर्यंत रस्ता तयार केला.
19. कोपटे वस्ती येथील गणपती मंदिर जवळ बहुउद्देशीय सभागृह बांधले.
20. मोरे मळा ते खोपट वस्तीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण केले.
21. चिंचोली रोड पूर्वेस फॅबटेक कॉलेज कडे जाणारा 9 मीटर रुंदीचा डीपी रस्ता केला.
22. दगडू आबा भुईटे घर ते सोपान केरबा इंगोले भुईटे वस्ती येथील रस्ता केला.
23. पाटील वस्ती कॅनॉल येथे बाळू घोंगडे घर ते उत्तरेस तानाजी काका पाटील ते शंकर फुले ते अरुण पाटील घरापर्यंत रस्ता केला.
24. बोराटे घर ते जाधव घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण केले.
25. आलेगाव रोड पाटील वस्ती येथील पांडुरंग पाटील दुकान गाळे ते सलीम पेंटर दुकान गाळे वाढेगाव नाक्यापर्यंत आरसीसी गटार केली.
26. जुना आलेगाव रोड ते रामचंद्र लवटे यांच्या घरापर्यंत उत्तरेस रस्ता केला.
27. प्रभाग क्रमांक दहा बापूजी नगर येथे दादा खडतरे घर ते प्रतीक्षा माने यांच्या घरापर्यंत रस्ता केला.
28. गोंधळी गल्ली येथे सभा मंडपाच्या वरती हॉल बांधकाम केले.
29. सांगोला शहरात वाढीव पथदिव्यांची व्यवस्था केली.
30. एकतपुर रोड येथील भाजी मार्केट विकसित केले.
सांगोला शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शेकडो कुटुंबांचा गृहप्रवेश
देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर असायला हवे या हेतूने शहरातील गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास शहरी योजनेची सुरुवात डिसेंबर 2015 रोजी करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या या योजनेची सांगोला नगर परिषदेमार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्याला स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य शासनाचे एक लाख व केंद्र शासनाचे दीड लाख असे एकूण अडीच लाख रुपये वितरित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार शहरात शेकडो कुटुंबांना घरांचा लाभ मिळाला.
बेरोजगारांना नोकरीची संधी
शहाजीबापू यांनी बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. सांगोला येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 785 तरुणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 345 बेरोजगार तरुणांना ऑन द स्पॉट नोकरी मिळाली. निवड झालेल्या या तरुणांना सुमारे 15 ते 40 हजारापर्यंत पगार मिळत आहे.
निवडक छायाचित्रे