
सांगोला (वार्ताहर) तालुक्यातील वाटंबरे येथील व्यापारी स्व. लक्ष्मण मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विधायक कार्यक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी गावातील स्मशानभूमी व भीमनगर येथे बसण्याचे लोखंडी बाक भेट देण्यात आले. मंगळवेढा येथील पूजा ऑप्टिकल व आयपीएल हॉटेलचे मालक प्रभाकर लिगाडे यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार प्राचार्या सौ. निता पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सायंकाळी वालचंदनगर येथील विजय सरतापे गायन पार्टीचे खास सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब ठोकळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ बनसोडे, बाळासाहेब धनवडे, दिनेश धनवडे, विघ्नेश बनसोडे यांनी अथक परिश्रम घेतले.
आमचे मित्र प्रा डॉ जवाहर मोरे हे कायम विधायक कार्याला झोकून देतात.त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेले उपक्रम हे निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी असून सतत आठवणीत राहणारे आहेत. त्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे मला वाटते.
– बापूसाहेब ठोकळे (बहुजन नेते)