
जवळा : विशेष प्रतिनिधी
मौजे भोपसेवाडी येथील बिरोबा मंदिर येथे भोपसेवाडी महिला सरपंच सौ. रखमा बिरा गावडे व ग्रामपंचायत महिला सदस्य यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास भोपसेवाडी येथील मा.सभापती सौ.मायाक्का यमगर, मा पंचायत समिती सदस्य सौ. सुमन यमगर, बचत गट उद्योग सखी सोनाली गुरव, बचत गट सर्व अध्यक्ष, सचिव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपस्थित असणाऱ्या महिलेस वाण वाटप करण्यात आले. यानिमित्त भोपसेवाडी येथिल सर्व महिला एकत्र आल्या होत्या. यामध्ये महिलांनी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते. त्या कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी भोपसेवाडी येथील सर्व महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. अशा सर्व महिलांचे ग्रामपंचायतीच्या वतीने सूत्रसंचालन व आभार सौ स्वाती यमगर यांनी केले.