अन्यथा, सांगोला आगारप्रमुखांना संभाजी ब्रिगेड काळे फासणार!
जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांचा इशारा
सांगोला / नाना हालंगडे
“जो अधिकारी एसटीच्या ब्रीदवाक्याला जाणत नाही, जो तालुकावासियांना त्रास देतो, अशा अकार्यक्षम अधिकाऱ्याची तालुक्याला काय गरज? जो तालुक्यातील प्रवाशीवर्गाना त्रास देतो. सांगोला आगार प्रमुखांच्या अकार्यक्षमतेमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बसेसची अवस्था दयनीय आहे. उपलब्ध बसेसचे नीट नियोजन लावले जात नाही. ही परिस्थिती २६ जानेवारी पूर्वी न बदलल्यास त्याच दिवशी संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करू. आगार प्रमुखांना काळे फासू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांनी “थिंक टँक”शी बोलताना दिला आहे.
येत्या काही दिवसांत सांगोला आगाराच्या कामकाजात पारदर्शकता, सुधारणा घडून प्रवाशांना व्यवस्थित सेवा न मिळाल्यास २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी सांगोला आगारात उग्र आंदोलन करून आगार प्रमुखाला वठणीवर आणू” असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांनी दिला आहे.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील म्हणाले की, आज सांगोला आगारातील एसटी बसेसचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. दोन दिवसांपूर्वी आमच्या कडलास गावातील व पारे तलाव येथील घडलेली घटना निंदनीय अशीच आहे. एकाच दिवशी एकाच बसचे दोनवेळा ब्रेक फेल होतात, ही अक्षम्य चूक आहे. अशा गंभीर चुका हलक्यात घेणाऱ्या आगार प्रमुखाला सुधारणा करणे जमत नाही का?
मोडक्या-तोडक्या, काचा नसलेल्या, खिळखिळ्या गाड्या सोडून हा आगारप्रमुख काय साध्य करतो? आज राज्यातील अनेक आगाराची हीच अवस्था असल्याचे सांगितले जाते. मात्र, आहे त्या बसेसची योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती करून गाड्या मार्गावर सोडणे, बसेस सुस्थितीत ठेवणे हे यांचे कर्तव्य नाही का?
तालुक्यातील ग्रामीण भागात महत्त्वाचे दळणवळणाचे साधन एसटी आहे. मात्र, तालुक्यातील जनतेला त्रास देण्यात धन्यता मानणाऱ्या अधिकाऱ्याला कशाला तालुक्यात ठेवायचे? अशा अधिकाऱ्याची तातडीने बदली न झाल्यास आगाराच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना जीवाला मुकावे लागेल. हा प्रकार संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही.
तालुक्यातील १०२ गावामध्ये ही एसटीची सेवा विखुरलेली आहे. जवळपास २८८ हून अधिक फेऱ्या ग्रामीण भागातील आहेत. आज बऱ्याच गावांचे तालुक्यापासूनचे अंतर ३५ किलोमिटरच्या पुढे आहे. आज याच गावांना मोडक्या-तोडक्या, काचा नसलेल्या, खिळखिळ्या गाड्या सोडून हा आगारप्रमुख काय साध्य करतो? आज राज्यातील अनेक आगाराची हीच अवस्था असल्याचे सांगितले जाते. मात्र, आहे त्या बसेसची योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती करून गाड्या मार्गावर सोडणे, बसेस सुस्थितीत ठेवणे हे यांचे कर्तव्य नाही का?
सांगोला बसस्थानकाची अशी भयाण अवस्था झाली असताना हा अधिकारी असे कोणतेच काम करीत नाही. तालुकावासिय प्रवाशांना सुरक्षित सेवा देणे लांबच, मात्र त्रास देणे येवढाच फंडा अवलंबला आहे.
संभाजी ब्रिगेड हे कदापिही सहन करणार नाही. अशाच या खिळगा झालेल्या एसटी बसमध्ये अधिकाऱ्याला बसवून तालुक्यातील ग्रामीण भागात फिरायला भाग पाडू. येत्या काही दिवसांत सांगोला आगाराच्या कामकाजात पारदर्शकता, सुधारणा घडून प्रवाशांना व्यवस्थित सेवा न मिळाल्यास २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी सांगोला आगारात उग्र आंदोलन करून आगार प्रमुखाला वठणीवर आणू” असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांनी दिला आहे.
हेही वाचा
सांगोला आगार “प्रवाशांच्या सेवेसाठी” की प्रवाशांना मारण्यासाठी?