
सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील कोळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार स्मारकास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी भेट दिली. यावेळी अस्थिविहारास त्यांनी चांदीचा कलश भेट दिला. कोळा भागातील युवा नेते ॲड. सचिन देशमुख यांच्या प्रयत्नातून हे अस्थिविहार साकारण्यात आले आहे.
या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा अध्यक्ष आरपीआय, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला तालुकाध्यक्ष आरपीआय, महाराष्ट्र सरचिटणीस आरपीआय, विभागीय अध्यक्ष तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी फुले साहेब, आरपीआय सांगोला तालुका अध्यक्ष खंडू सातपुते, कोळा ग्रामविकास अधिकारी खटकाळे, माजी पंचायत समिती सभापती संभाजी तात्या आलदर, माजी पंचायत समिती सदस्य सिताराम सरगर, पैलवान हरिभाऊ सरगर, जितेंद्र बनसोडे, विक्रम शेलके, किरण तात्या धाइंजे, मिलिंद सरतापे, दामोदर साठे,
युवक नेते संदीप पाटील, रफिक भाई तांबोळी, सोपान कोळेकर, तुकाराम दादा आलदर, डॉक्टर सादिक पटेल, सांगोला तालुका सहकारी सूतगिरणीचे संचालक दिलीप देशमुख, अर्बन बँकेचे चेअरमन आप्पासाहेब सरगर यांच्यासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सोसायटी सदस्य, सूतगिरणीचे सदस्य, साखर कारखान्याचे संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी या स्मारकाची पाहणी केली. केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख यांचे अभिनंदन केले.