“प्रथम” फाउंडेशनतर्फे प्रमाणपत्र वाटपाचा शुक्रवारी कार्यक्रम
आ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते होणार वितरण

सांगोला : विशेष प्रतिनिधी
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने पार पडलेल्या वेल्डिंग, फूड अँड बेवरेज जनरल ड्युटी असिस्टंट या कम्युनिटी कॅम्पच्या यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम शुक्रवारी सांगोला येथे आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी ॲड. राजेश ठोकळे (प्रोग्राम डायरेक्टर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन) हे उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रभाकर माळी (चेअरमन भाई गणपतराव देशमुख सांगोला सूतगिरणी) हे असतील. सुधाकर भदरगे (राज्य समन्वयक प्रथम एज्युकेशन फाउंडेशन) यांची प्रमुख उपस्थिती असेल.
सांगोला येथील महात्मा फुले सभागृहात दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व बुद्ध भिमराज मागासवर्गीय संघटनेचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे सांगोला तालुका समन्वयक बापूसाहेब ठोकळे यांनी केले आहे.