ताजे अपडेट
Trending

मोहिते-पाटलांच्या एन्ट्रीने हवा टाईट

बाबासाहेबच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार

Spread the love

“शरद पवार साहेबांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचे काम करायचे आहे. हा उमेदवार निवडून आला पाहिजे. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा बालेकिल्ला पुन्हा एकदा शेकापच्या ताब्यात आला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत बाबासाहेब देशमुख ही निवडून आले पाहिजेत त्यासाठी ताकतीने काम करा” अशा सूचना शरद पवार यांनी केल्यामुळेच मी दोन दिवस तळ ठोकून या मतदारसंघात काम करत असल्याचे त्यांनी विविध सभांमधून सांगितले.

सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
महाविकास आघाडीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते -पाटील यांच्या सांगोला येथील एन्ट्रीने तालुक्यातील नेत्यांची हवा टाईट झाली आहे. मोहिते-पाटील यांनी शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचाराचा धडाका लावल्याने बाबासाहेब हेच महाविकास आघाडीचे सांगोला तालुक्यातील अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

मोहिते पाटील यांनी सांगोला मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार सभांचा धडाका लावल्याने विरोधी गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेकाप उमेदवाराला अपक्ष, बंडखोर उमेदवार असे म्हणत “तुम्ही बंडखोरी मागे घेऊन सहकार्य करा. तुम्ही तसे नाही केले तर महायुतीला मदत करत आहात असे सिद्ध होईल. तुम्हाला पाप लागेल” अशी टीका केली होती. ठाकरे यांच्या सभेतील पोस्टरवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचीही प्रतिमा छापण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यातील मतदारांमध्ये महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

मात्र धैर्यशील मोहिते-पाटील हे आज बुधवारपासून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले आहेत. ते आज बुधवार आणि उद्या गुरुवारी दोन दिवस तब्बल 15 हून अधिक जाहीर सभा घेत आहेत. आज सायंकाळी पाचच्या सुमारास अकोला गावात जाहीर सभा घेत आहेत. त्या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोहिते पाटील यांनी आज सकाळपासून मेथवडे, मेडशिंगी, वाटंबरे, कडलास, सोनंद आदी गावांमध्ये सभा घेतल्या. या सभांमध्ये त्यांनी पक्षाच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केली.

“शरद पवार साहेबांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचे काम करायचे आहे. हा उमेदवार निवडून आला पाहिजे. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा बालेकिल्ला पुन्हा एकदा शेकापच्या ताब्यात आला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत बाबासाहेब देशमुख ही निवडून आले पाहिजेत त्यासाठी ताकतीने काम करा” अशा सूचना शरद पवार यांनी केल्यामुळेच मी दोन दिवस तळ ठोकून या मतदारसंघात काम करत असल्याचे त्यांनी विविध सभांमधून सांगितले.

मेडशिंगी येथील सभेत बोलताना त्यांनी विरोधी गटातील स्वयंघोषित उमेदवाराचा पंचनामा केला. ज्यांनी आपल्याला राजकारणात उभे केले त्या पवार साहेबांना सोडून ते अजित पवारांच्या गटात गेले. अजित पवारांनाही सोडून ते आता शिवसेनेत गेले आहेत, असे म्हणत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारावर सडकून टीका केली.

“ज्या उद्धव ठाकरेंनी संधी दिली आणि तब्बल 30 वर्षानंतर तुम्ही आमदार म्हणून निवडून आला. त्याच उद्धव ठाकरे यांना तुम्ही दगा देत शिंदे गटात जाऊन सहभागी झाला” असे म्हणत त्यांनी विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावरही निशाणा साधला. या दोन्ही उमेदवारांच्या एकूण कारभारावर बोलताना त्यांनी स्वच्छ आणि निष्कर्ष प्रतिमा असलेल्या तरुण उमेदवाराला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना यावेळेस कोणत्याही परिस्थितीत निवडून आणावे असे आवाहन त्यांनी केले.

मोहिते पाटील यांनी सांगोला मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार सभांचा धडाका लावल्याने विरोधी गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीचे खासदारच अधिकृतरित्या महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार हा बाबासाहेब देशमुख हेच आहेत असे सांगितल्याने मागील काही दिवसांपासून निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेवर पडदा पडला असून बाबासाहेब देशमुख हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका