
सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुका हा परंपरेने दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. मात्र आता ही परिस्थिती बदललीय. तालुक्याच्या दुष्काळाचा कलंक मिटवण्याचे खरे श्रेय आमदार शहाजीबापू पाटील यांना जाते. स्वतःला पाणीदार नेते म्हणून घेणारे अनेक नेते तालुक्यात दिसून येतील. मात्र सांगोला तालुक्यात पाणी आणण्याचे खरे श्रेय शहाजीबापूंनाच जाते. बापूंच्या दोन टर्मच्या आमदारकीच्या काळात त्यांनी केलेले परिश्रम पाहिल्यास ही बाब आपणास ठळकपणे अधोरेखित होते. स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना, शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, टेंभू उपसा जलसिंचन योजनेतील सांगोला कालवा प्रकल्प या तीन प्रकल्पांच्या माध्यमातून शहाजीबापूंनी नेमके काय काम केले याचा लेखाजोखा या स्पेशल रिपोर्टमधून घेण्यात आला आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना
शहाजीबापूंना तालुक्याचे आमदार म्हणून नेतृत्व करण्याची पहिली संधी 1995 साली मिळाली. अगदी दोन वर्षांत 1997 साली त्यांनी सांगोला उपसा सिंचन योजना मंजूर करून आणली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले. मात्र सरकारकडून ही योजना पूर्णत्वाला जावू शकली नाही. शहाजीबापू 2019 साली पुन्हा आमदार झाले आणि या योजनेला तब्बल 884 कोटींचा निधी मिळवून आणला. पहिल्या टप्प्यातील कामासाठी 299 कोटींचे टेंडरही निघाले आहे. या योजनेचे नामकरण स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना असे केले. या योजनेतून तब्बल 9 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ही योजना मंजूर करून आणून तिला गती देण्याचे खरे श्रेय शहाजीबापू पाटील यांना जाते.
शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाही 1999 साली शहाजीबापूंनीच मंजूर करून आणली. यासाठी त्यावेळी 99 कोटी रुपये निधी बापूंनी मिळविला. शहाजीबापू 2019 साली आमदार होताच त्यांनी या योजनेच्या आधुनिकीकरणासाठी 300 कोटी रुपये मंजूर करून घेतले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही योजना चालविण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र शहाजीबापूंनी हिवाळी अधिवेशनात या योजनेच्या थकीत अनुदानासोबतच ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेच चालवावी हा निर्णय मंजूर करून घेतला. या योजनेतून तब्बल 82 गावांना पाणी पुरविले जाते. 1999 सालानंतर मधल्या काळात मरगळीला आलेल्या या योजनेला 2019 साली नवसंजीवनी देण्याचे काम बापूंनी केले.
टेंभू उपसा सिंचन योजना
टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी 2019 ते 2024 या कालावधीत शहाजीबापूंनी मोठी गती देत उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी आपली ताकद लावली. 36 पाय पुलांची निर्मिती, थेट विमोचक, अधिजलमार्ग, जलझुंपी शुंडिका, काट नियामक आणि इतर बांधकामांसाठी 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला. प्रलंबित भूसंपादनासाठी 16 कोटी 42 लाख रुपये मोबदला वितरित केला.
म्हैसाळ योजना, नीरा कालवा प्रकल्प या दोन महत्त्वाच्या प्रकल्पासोबतच माण नदीत टेंभूचे पाणी आणण्याचे खरे श्रेय आमदार शहाजीबापू पाटील कसे जाते याचा लेखाजोखा पुढील स्पेशल रिपोर्टमध्ये मांडणार आहोत. हा रिपोर्टही नक्की वाचा
या योजनेच्या लाभ क्षेत्रातील 90 टक्के विकासकामे पूर्ण असून त्यासाठी 57 कोटी रुपये खर्च झाला आहे. 19 बंदिस्त नलिका वितरीकांची कामे पूर्ण असून त्यासाठी 60 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या योजनेतून 15 हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
विस्तारित टेंभू उपसा सिंचन प्रकल्पात आटपाडी तालुक्यातील कामथ येथील गुरुत्व नलिका, बेवनूर येथील वितरीका या दोन कामांचा समावेश आहे. कामथ गुरुत्व नलिकेतून सांगोला तालुक्यातील 5 गावांतील 3 हजार 544 हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ मिळणार आहे. त्यासाठी 85 कोटी निधी मंजूर झाला आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून वर्क ऑर्डर निघाली आहे. बेवनूर वितरिकेतून सांगोला तालुक्यातील 6 गावांतील 903 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या कामासाठी 25 कोटी खर्च अपेक्षित आहे. तेही काम पूर्ण करण्याचा बापूंचा मनोदय आहे.
म्हैसाळ योजना, नीरा कालवा प्रकल्प या दोन महत्त्वाच्या प्रकल्पासोबतच माण नदीत टेंभूचे पाणी आणण्याचे खरे श्रेय आमदार शहाजीबापू पाटील कसे जाते याचा लेखाजोखा पुढील स्पेशल रिपोर्टमध्ये मांडणार आहोत. हा रिपोर्टही नक्की वाचा