
सांगोला : प्रतिनिधी
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार तथा माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, सोमवारी मोटरसायकल रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड. शहाजीबापू राजाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मोटर सायकल रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी दिली आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ॲड. शहाजीबापू राजाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मोटरसायकल रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे . रॅलीचा मार्ग एखतपूर रोड ब्रिजपासून सुरुवात होऊन अंबिका मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक वाढेगाव नाका, कडलास नाका, वासुद चौक, महात्मा फुले चौक ,नेहरू चौक असा आहे. रॅली संपल्यानंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोटरसायकल रॅलीसाठी व सभेसाठी सांगोला शहर व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी , कार्यकर्ते, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे.