सांगोला : विशेष प्रतिनिधी
आमदार शहाजीबापू पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाला धक्का दिला आहे. सांगोला तालुक्यातील चिंचोली गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या 30 युवा कार्यकर्त्यांनी शनिवारी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश करून आमदार शहाजीबापू पाटील यांना समर्थ साथ देऊ व येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेतील सांगोला तालुक्यातील पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेनेकडे तरुणांचा कल वाढत असून तरुणांची फळी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे.
शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना आमदार शहाजीबापू पाटील यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले व सतर्क राहून जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याविषयी आवाहन केले.
पक्षप्रवेशावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील, शिवसेना नेते दादासाहेब वाघमोडे सर ,शिवसेना नेते आनंदकाका घोंगडे, युवा सेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे , युवा सेना शहरप्रमुख समीर पाटील यांच्यासह आदी मान्यवर, शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील चिंचोली गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विकासाच्या मुद्द्यावरती एकत्रित येऊन आमदार शहाजीबापू पाटील यांना विधानसभा निवडणुकीत मोलाची साथ देण्यासाठी व आमदार करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुणांमध्ये शिवाजी सरगर, सागर पारसे, सुरज पारसे, ,विपुल पारसे, कुमार सूर्यगण, आशिष खंडागळे ,सुजित करडे,विशाल बनसोडे ,ओंकार ऐवळे, रवी ऐवळे, अजय शेख ,कबीर शेख, आकाश भोसले, अजय भोसले, साहिल भजनावळे, संजय इंगोले, पंकज ऐवळे, विकास पारसे, साहिल पारसे, हरी ऐवळे, बळीराम ऐवळे, काशिलिंग ऐवळे, सुरेश कांबळे, सोमनाथ हेगडे, गोपीनाथ गोरे, आदित्य ऐवळे, किरण सरगर, दत्ता काळे, स्वप्नील पारसे, या तरुण कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे . तरुण कार्यकर्त्यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश हा बापूंसाठी जमेची बाजू आहे, असे बोलले जात आहे.