सागर पाटील यांच्या गाडीवरील हल्ल्याची सखोल चौकशी करून कारवाई करा
आ. डॉ. बाबासाहेब देशमुखांची पोलिसांना सूचना
सांगोला : विशेष प्रतिनिधी
भाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या कार्यकाळात राजकीय व्यक्तीवर हल्ला झाल्याची घटना कधीही घडली नाही. माझ्या कार्यकाळातही अशा प्रकारच्या घटनांना थारा दिला जाणार नाही. शिवसेनेचे नेते सागर पाटील यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची घटना निषेधार्थ असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची सूचना पोलिसांना केल्याची माहिती शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तातडीने तपासाला सुरुवात केली आहे.
ही घटना समजताच आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड तसेच सांगोला पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्याशी संपर्क साधून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणाची तातडीने दखल घेत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड तसेच सांगोला पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्याशी संपर्क साधून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सांगोला तालुक्यामध्ये स्व. आबासाहेबांनी ज्या पद्धतीने सुसंस्कृत राजकारण व समाजकारण केले होते त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात सुद्धा त्याच पद्धतीचे कामकाज करण्यात येणार असून गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा देण्यात येणार नाही. त्यामुळे अशा हल्ल्यांना शेतकरी कामगार पक्ष कदापिही पाठीशी घालणार नसून या घटनेचा मी व्यक्तीश: निषेध करत असून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
या घटनेची माहिती कळताच आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या घटनेचा खोलात जावून तपास करावा. दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना केली.