बाबासाहेब आमदार झाले अन् कार्यकर्ता फेडतोय नवस!
नेत्यांसाठी "दीपक" तेवत ठेवणारा अध्यक्ष
स्पेशल स्टोरी / डॉ.नाना हालंगडे
डॉ. बाबासाहेब देशमुख हे आमदार व्हावेत यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी पन केले, काहींनी नवस सायास केले, साकडे घातले. आपण केलेल्या प्रार्थनेला फळ आले आणि बाबासाहेब आमदार झाले या भावनेतून आता अनेक कार्यकर्ते नवस किंवा पन पूर्ण करताना दिसत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे दीपक गोडसे.
सांगोला मार्केट कमिटीचे संचालक तथा पुरोगामी युवक संघटनेचे सांगोला तालुकाध्यक्ष भाई. दीपक बाळासाहेब गोडसे यांनी डॉ. बाबासाहेब आमदार होवू दे म्हणून तुळजाभवानी मातेला ज्या दिवशी अर्ज भरला होता त्याच दिवशी साकडे घातले होते. हेच साकडे अर्थात पन यांनी पायी चालतं जात पूर्ण करण्याचे नवस फेडण्यास सुरुवात केली आहे. आपल्याच नेत्यांसाठी दीपक तेवत ठेवणाऱ्या अध्यक्षांच्या याच नवसाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.
त्याचे झाले असे डॉ.बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख हे आमदार व्हावेत म्हणून गायगव्हाण गावचे युवक नेते तथा पुरोगामी युवक संघटनेचे सांगोला तालुका अध्यक्ष भाई. दीपक बाळासाहेब गोडसे व त्याचे सहकारी मित्र भाई.नवनाथ देवकते यांनी मंगळवार ३ डिसेंबर रोजी तुळजापूरला पायी चालत जात नवस फेडण्यास सुरुवात केली आहे.
गेली तीन पिढ्यापासून गोडसे कुटुंबीय देशमुख कुटुंबीयांशी एकनिष्ठ आहेत. ज्या दिवशी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभेसाठी अर्ज भरला त्याच दिवशी यांनी नवस बोलले होते. यांच्या याच आमदारकीसाठी अनेकांनी वेगवेगळे फंडेही अवलंबले होते. हेच दीपक गोडसे गेली तीन पिढ्यासाठी शेकापशी एकनिष्ठ आहेत. याच निवडणुकी दरम्यान दीपक गोडसे यांनी जीवाचे रान करीत तालुकाही पिंजून काढला होता. त्यांचा ह्या विजयात मोलाचा वाटा आहेच. पण आपण जे काही बोललो होतो, ते पूर्ण करण्यासाठी दीपक गोडसे यांनी मंगळवार पहाटेपासून नवस फेडण्यासाठी सुरुवात केली आहे.
आज मंगळवार ३ डिसेंबर रोजी ते पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे मुक्कामी आहेत.रोज ४० किमी अंतर ते चालतं आहेत. त्यांचे गाव ते तुळजापूर १३५ किमी अंतर आहे. ते दोघेजण गुरुवार ५ डिसेंबर रोजी तुळजापूर येथे देवीच्या दरबारी पोहचणार आहेत. तुंगत येथील मुक्कामाच्या ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी गावकरी ही म्हणाले चांगल्या माणसासाठी तुम्ही हे नवस फेडत आहात, ही चांगलीच गोष्ट आहे. तालुक्याच्या विकासाचा दीप ही तुम्ही सर्वच जण मिळून असाच तेवत ठेवा.असेही येथील गावकरी म्हणाले.
नूतन आम्.डॉ.बाबासाहेब यांची जनमाणसात बाबासाहेब प्रती आबासाहेब अशीच ओळख निर्माण झाली आहे. हुबेहूब तीच ध्येयबोली अन् काम करण्याची पद्धत अनेकांना भावत आहे. आता बाबासाहेब आमदार झाले अन् तालुक्यात नवचैतन्य पसरले आहे.
दीपकभाई मशाल पेटविणार!
आपला नेता आमदार झाला. मी जे काही पनं अर्थात नवस बोललो होतो,ते आई तुळजाभवानीच्या माथी नतमस्तक होत नवस फेडणार आहे. प्रारंभी मशाल अर्थात ज्योत पेटवून आई मातेचा उदोउदो करणार आहे, असे गोडसे यांनी सांगितले. ही नेत्याची आमदारकी तालुक्याच्या विकासाठी चांगलीच कारणीभूत ठरावी म्हणून ही साकडे घालणार आहे. दीपकभाईंची विजयाची ज्योत अन् डॉ. बाबासाहेबांच्या आमदारकीची अशीच चर्चा सध्या राज्यभर रंगत आहे.