सांगोला / डॉ.नाना हालंगडे
सोन्याच्या सांगोल्यात ज्या काही दृष्ट प्रवर्तीनी नंगानाच चालविला होता त्याला प्रथम मूठमाती देणे हे आद्य कर्तव्य आहे. तालुक्यात अपेक्षांचा डोंगर उभा असून हीच आव्हानांची दरी पूर्ण करणे गरजेचे आहे. निवडणूक संपली आता मुद्द्यांचे बघा, हे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना करावेच लागेल. तरच सांगोला तालुक्यात शांतता नांदेल.
गेली पाच वर्ष लोकांनी निवडून दिलेल्या नेत्यांच्या बगलबच्यानी दहशत माजविलाली होती. नित्कृष्ट कामे आणि टक्केवारीने तालुका अक्षरश: पोखरून काढला. त्यातच तालुक्यात विविध कार्यालयात खुर्चीला मिठ्ठी मारून बसलेल्या अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना कात्रजचा घाट दाखविने तितकेच उचित ठरणार आहे. हे अधिकारी अक्षरशा कुणालाच जुमानत नव्हते.
नवखे असलेल्या डॉ.बाबासाहेब यांच्या समोर आव्हानाचा डोंगर उभा आहे. त्यात राजकीय प्रशासकीय युतीचे नष्टचक्र, आरोग्याहमी कायद्याने हवी, हवे उद्योगस्नेही धोरणाचे बळ, गतिमान शिक्षण गरजेचे, नको मेहरबानी, हवा श्रमाला खणखणीत दाम, शिक्षण गुणवत्तेचं चांगभलं त्याबरोबर ईडापिडा टळो, शेतकरी-कामगारांचे, बळीचे राज्य येवो हीच यांच्याकडून अपेक्षा आहे.
तालुक्यात ज्या काही दृष्ट प्रवर्तींनी निवडणुकीत गलका केला होता. त्यांना जनतेनेच दाखवून दिले. तालुक्याला तरुण कसे तारू शकतात, हेच तरुणांनी दाखवून दिले. यामध्ये प्रामुख्याने प्रशासकीय त्रुटी, प्रशासकीय विकलांगता, उधळलेला वस, नोकरशाहीचा खेळ, भ्रष्टाचार रोखा, अपारदर्शकतेकडे असलेली वाटचाल, मनमानी पद्धतीने कामकाज करणारी प्रशासकीय यंत्रणा, ज्या काही राजकीय खेळी प्रत्येक निवडणुकीत अवलंबलेल्या जात होत्या त्यांनी ही कायमची सुट्टी देण्यात यावी.