विजय बाबासाहेबांचा अन् जल्लोष वृक्षारोपणाचा
बिभीषण सावंत लावणार विजयी मता इतकीच झाडे
सांगोला/ नाना हालंगडे
राम-लक्ष्मण-सितामाईने सांगोल्यात विक्रमच केला. २५ हजार ३८४ मतांनी विरोधकांना हाबडा दिला. यात बहाद्दर कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेत विजय संपदित केला.
सांगोला विधानसभा निवडणुकीचा माहोल राम_लक्ष्मण अन् सीतामाई या तिन्ही डॉक्टर बंधूंच्या हाबड्याने चांगलीच गाजला. यात डॉ. बाबा साहेब,डॉ.अनिकेत व डॉ.निकिताताई यांनी पायाला भिंगरी लावून,रात्रीचा दिवस करून, विरोधकाना घराचाच रस्ता दाखविला. यात डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा २५ हजार ३८४ मतांचा हाबडा बरेच काही सांगून गेला. सांगोला विधानसभा मतदार संघांमध्ये डॉ.बाबासाहेब देशमुख यांना १लाख१६ हजार २८० तर विरोधी असलेले अँड. शहाजीबापू पाटील यांना ९० हजार ८९६ इतकी मते पडली.
यात शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख २५ हजार ३८४ मतांनी विजयी झाले. यांचा विजयी जेवढा मताने झाला तेवढीच झाडे तालुक्यात हंगीरगे गावचे सुपुत्र, झाडवाले बाबा बिभीषण सावंत हे लावणार आहेत. सांगोला तालुक्यात आदर्श ग्रामविकास अधिकारी बिभीषण सावंत हे गेली २० वर्षापासून झाडवाले म्हणून सुप्रसिद्ध आहेत.
आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम १ लाखाहून अधिक झाडे लावून,पर्यावरण समृद्धीचा वेगळाच पायंडा पडलेला आहे.त्यात आपली निष्ठा ज्या घराण्याविषयी विषयी आहे,त्यांना तर ते अविरतच ठेवतात.अशातच विधानसभा निवडणुकीत स्व.आबासाहेबांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी निकराची टक्कर देत,विक्रमी विजय संपादित केला.त्यातच त्यांचा २५ हजार ३८४ मतांनी विजय मिळाला.याच विजया एवढी झाडे,अन् ज्या गावात कमी मतदान झाले त्याच्या आकडेवारी तेवढी ही झाडे लावण्यात येणार आहेत.