
सांगोला : प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील ज्येष्ठ नेते दामोदर कृष्णा करांडे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या तिसऱ्या दिवसाच्या विधीस उपस्थित राहून आमदार बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
बुधवार ११ डिसेंबर रोजी कै.दामजी यांचा तिसरा दिवस होता. यानिमित्त झाडवाले बाबा बिभीषण सावंत यांच्या संकल्प नेतून मयताच्या तिसऱ्या दिवशी अस्ति झाडांच्या खड्ड्यात पुरून त्याच ठिकाणी वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
मानवी जीवनास जन्मापासून ते मरेपर्यंत श्वासाची गरज असते.ती गरज झाडच पूर्ण करू शकते.झाडं आहे तरच माणसाची वाढ आहे.त्यामुळे झाडे लावून तालुका समृद्ध करा,जीवनमान चांगले होईल.हीच उक्ती नूतन आम्. भाई डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विजयानंतर घोषित केली.याची प्रत्यक्षात सुरुवात ही डिकसळ गावातील ज्येष्ठ नेते दामजी करांडे यांच्या तिसऱ्या दिवसापासून करण्यात आली.