मी डॉ. बाबासाहेब सरोजिनी अण्णासाहेब देशमुख शपथ घेतो की“
आ. बाबासाहेब देशमुखांनी घेतली शपथ
मुंबई : डॉ. बाळासाहेब मागाडे
शेतकरी कामगार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आज रविवारी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभेचे विशेष अधिवेशन मुंबईत सुरू आहे. यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. “महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे भीष्माचार्य श्री गणपतराव देशमुख यांच्या स्मृतिस स्मरून..” अशी सुरुवात करून आ. बाबासाहेब देशमुख यांनी शपथ ग्रहण केली.
विधानसभा विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज विविध पक्षाच्या उर्वरित आमदारांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळा अजूनही सुरू आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभा सदस्य याची शपथ घेतल्यानंतर सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेने आनंद आणि जल्लोष व्यक्त केला. शेकाप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे बाबासाहेब देशमुख यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
शपथविधी सोहळ्यानिमित्त आमदार बाबासाहेब देशमुख मागील तीन दिवसांपासून मुंबई येथे आहेत. त्यांच्या निवडीबद्दल मुंबई येथील असंख्य कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. विविध समाज घटकातील कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत.