सांगोला / डॉ. नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे उद्या रविवारी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत.
सर्वच नवनिर्वाचित आमदारांचा शपथ विधी आज ७ डिसेंबर रोजी व उद्या रविवार ८ डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले. आज पहिला दिवस चांगलाच गाजला. सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख हे दोन मुरलेल्या पैलवानांना हरवून विधानसभेत गेले आहेत. जसे आमदार झाले तसे ते मुंबईत जादा काळ तळ ठोकून आहेत. त्यामुळे सांगोल्याचा विकासाची गाडीही पुन्हा सुसाट धावणार आहे हे त्यांनी सांगुनच टाकले आहे.
आज शनिवार विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस असताना महविकास आघाडीचे अनेक आमदार सभागृहातून बाहेर पडले आहे. मात्र डॉ.बाबासाहेब देशमुख हे सभागृहातच होते. त्यांचा शपथविधी उद्या दुपारी १२ वाजनेच्या सुमारास होणार आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी झालेला आहे. हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होणार असून,त्यापूर्वी सर्वच आमदारांचा शपथविधी आणि ११ ते १२ डिसेंबर रोजी सर्वच नवनिर्वाचित मंत्र्यांना खाती वाटप करण्यात येणार आहे.
स्पष्ट बहुमत असल्याने शासकीय सुट्टी असतानाही सर्वच यंत्रणा कामाला लावून हंगामी अध्यक्ष कालिदास कोलमकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अधिवेशन बोलावले आहे. या तीन दिवसात सर्वच नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाणार आहे. ज्येष्ठतेनुसार दररोज ९० आमदारांना हा शपथविधी दिला जाणार आहे. पण महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केल्याने अनेक आमदारांनी पहिल्या दिवशीच दालन सोडले आहे. ते आपल्या नेत्यांच्या भेटीला गेले आहेत. असे सर्व असले तरी उद्या रविवार सर्वच आमदारांना शपथ ही घ्यावीच लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
मात्र आज पहिल्याच दिवशी महायुतीतील अनेक आमदारांनी शपथ घेतलेली आहे. आज विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मात्र आम्.डॉ.बाबासाहेब देशमुख हे सभागृहात थांबून आहेत.याचा शपथविधी उद्या रविवार ८ डिसेंबर रोजीच होणार आहे.
नववर्षात सुरू करावा लागेल कामांचा धडाका
नूतन आम्.डॉ.बाबासाहेब देशमुख यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. समोर समस्यांचा डोंगर आहे.२०२४ चा निवडणूक माहोल संपल्यात जमा आहे.अवघ्या १५ ते २० दिवसानंतर नवीन वर्ष अर्थात २०२५ साल सुरू होणार आहे.यात यांना कामांचा धडाकाच सुरू करावा लागणार आहे.यांच्याकडून तालुका वासियांना खूप आशा आहेत.त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनात ही अनेक प्रश्न उपस्थित करून,तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी आणावा लागणार आहे.
डॉ.बाबासाहेब देशमुख सभागृहात
नवीन सरकारने बोलाविलेल्या पहिल्याच विशेष अधिवेशनात महाविकास आघाडीतील अनेक आमदारांनी शपथविधीला नकार दिल्याने ते सभागृहातून बाहेर पडले. त्यांनी ईव्हीएम विरोधात लढा उभारला आहे. यातील बरेच आमदार आपल्या नेत्यांना भेटण्यास गेले आहेत. मात्र सांगोल्याचे नवनिर्वाचित आम्.डॉ.बाबा साहेब देशमुख हे सभागृहात आहेत. त्यांच्या आमदारकी भोवती एक वलय आहे.नवीन चेहरा अन् महायुतीतील सर्वांचीच त्यांचे चांगले संबंध आहेत.त्यामुळे सोन्याचं सांगोल पुन्हा उदयास येणार आहे.