ताजे अपडेट
Trending

लग्न सभारंभाला राजकीय स्वरूप देऊ नका : ज्ञानदेव करवर

हटकर वधू-वर व समाज मेळाव्यात आवाहन

Spread the love

लग्न हा कौटुंबीक सोहळा आहे. तो साध्या पध्दतीने करावा. त्याला राजकीय स्वरूप येऊ देवू नका. लग्नामध्ये लग्नपत्रीका, हार तुरे, सत्कार शक्यतो टाळा.

सांगोला/डॉ.नाना हालंगडे
शूरविर संभाजी करवर प्रतिष्ठान व हटकर संघटनेच्यावतीने चांगले कार्य सुरु आहे. हे कार्य राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविण्याची गरज आहे. हे कार्य समाजातील तरुणांनीच पुढे येऊन पोहचविले पाहिजे असे आवाहन ज्ञानदेव करवर यांनी केले. त्यातच समाजात होत असलेले लग्न सोहळे याला राजकीय स्वरूप आणू नका. हटकर संघटना व शुरविर संभाजी करवर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वधु-वर परीचय मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ज्ञानदेव करवर बोलत होते.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याच वेळी पुढे बोलताना करवर म्हणाले, नव वधु-वरांची लग्नपत्रिका किंवा कुंडली बघण्याची आवश्यक्यता नाही. कारण त्याला शास्त्राचा आधार नाही. सोयरीक जुळवताना जवळचे नातेवाईकांच्या नात्याच्या पलीकडचे नाते जोडावे. मुला-मुलीच्या अतिमहत्वकांक्षेमुळे मुला मुलीचे लग्नाचे वय वाढु देऊ नये. लग्न हा कौटुंबीक सोहळा आहे. तो साध्या पध्दतीने करावा. त्याला राजकीय स्वरूप येऊ देवू नका. लग्नामध्ये लग्नपत्रीका, हार तुरे, सत्कार शक्यतो टाळावे, असे ही करवर यांनी शेवटी सांगितले.

यावेळी, प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग सोलापुरचे चंद्रकांत होळकर, पो. निरिक्षक गोदे साहेब, संघटनेचे मार्गदर्शक साहेबराव पाटील, जत तालुक्याचे युवा नेते,नाथा पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी रानगर साहेब, डॉ. नितीन चौंडे, डॉ. एस.एम.दबडे, अ‍ॅड. बंडु पाटील, बंडगर गुरूजी, अ‍ॅड. शरद पाटील, शिवानी उद्योग समुहाचे विश्‍वास निळे, मारुती भुसनर, राजु नाईकवडी, रुक्मिणी मल्टिपर्पज हॉलचे महादेव येजगर, विजय येजगर, विजय भुसनर, नवनाथ पाटील, कर्तव्य संस्थेचे हेमंत पाटील, सरपंच बाबुराव सोपे, कृषीरत्न सदाशिव चौगुले, बापुसो दबडे, सुकदेव पाटील,अशोक करताडे, पांडुरंग पाटील, जयाप्पा बेलदर, बाळासाहेब कोरके पै. नितिन निळे, जालिंदर महाराज चौगुले, सुरेश पाटील, नामदेव घुणे, बंडु सोपे, बापू निळे, नितिन जुजारे, श्री व सौ. राजश्री चौगुले, युवा कार्यकर्ता रोहन पाटील आदी उपस्थित होते.

हटकर समाज हा वेगवेगळ्या भागात विखुरलेला असुन प्रामुख्याने शेती व्यवसाय आहे. राजकीय क्षेत्रापासुन वंचीत असलेल्या या समाजाला शासनदरबारी स्थान मिळाले पाहिजे. तसेच शासनकडुन विविध योजनांचा लाभ मिळाला पाहीजे. शासनाच्या मुख्य प्रवाहात हटकर समाज आला पाहीजे. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत मुख्याध्यापक भुसनर सर यांनी व्यक्त केले.

देशातील अनेक जाती अर्थिक, शौक्षणिक क्षेत्रात विकासापासुन दुर आहेत. स्वातंत्र्यानंतरही हटकर समाजाचे प्रश्‍न कायम असल्याचे मत दत्तात्रय भुसनर यांनी सांगीतले. समाज्यांचा चौफेर विकासासाठी तरुणांनी एकत्र येण्याची गरज असून आपले मुलभुत प्रश्‍नांसाठी संघर्षाची तयारी करावी असे कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे संचालक शंभुराज विनायक पाटील यांनी सांगीतले.

यावेळी पोलिस नाईक गोदे, विजय मरगर यांनी मनोगत व्यक्त केले. घोरपडी गावचे गजीढोल कलाकार यांनी कार्यक्रम सादर केला. संघटनेचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ, महिला व समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमावेळी लक्ष्मण निळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रस्तावना मुकुंद व्हळगळ यांनी केले. सूत्रसंचलन आबासो पाटील व आभार आण्णासो भुसनर महाराज यांनी मानले.


कुशल कर्मचाऱ्यांना मारावा लागतो झाडू

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. डॉ. बाळासाहेब मागाडे संपादक (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका