सांगोला/नाना हालंगडे
सांगोला शहरासह अख्खा तालुका सकाळी नऊ ते रात्री सव्वा नऊ असे एकूण १२ तासाहून अधिक काळ अंधारात होता. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक कामे खोळंबली होती. तालुकावासियांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
काल मंगळवारी सांगोला महावितरणने शहरासह तालुक्यातील विद्युत पुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहील,असे जाहीर आवाहन केले होते. त्यातही लवकर विद्युत पुरवठा सुरू करण्यात येईल, असेही सांगितले होते. आता ही महावितनने रात्री ९:३० वाजता लाईट सोडून प्रकाश पडला.
सांगोला शहरासह तालुक्यात बुधवार ८ जानेवारी रोजी महावितरणने आवाहन केले होते. त्यामुळे विद्युत पुरवठा सकाळी ९ वाजत बंद केला होता. सायंकाळी ६ वाजता लाईट येईल असे सांगितले होते. त्यानंतर सात वाजताचे टायमिंग सांगितले. आता तर चक्क साडे नऊ वाजता लाईट सोडली. बारा तासाहून अधिकचा कालखंड शहरासह तालुका वासियांना अंधारात काढावा लागला. त्यामुळे शहरवासिय बेजार झाले आहेत. त्यातच डासांचा हैदोस यामुळे अनेकांना भर थंडीत रस्त्यावर यावे लागले.
सांगोला तालुक्यात महावितरण कंपनीच्या मनमानी कारभार सुरू आहे. येथे कोणीच कोणाला जुमानत नाही. जर का यांना देखभाल दुरुस्तीचे काम करावयाचे असेल तर रात्री हे महाशय काय करतायेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.