ताजे अपडेट

प्रवासी म्हणाले “एसटी पळव”, ड्रायव्हर गाडी सोडून स्वतः पळाला

प्रवाशांची झाली गाढव फजिती

Spread the love

बोरिवली ते पुणे दरम्यान बस चालकाने जवळपास तीन ते चार तास उशीर केला होता. त्यामुळे बोरिवलीहून निघालेले प्रवाशी चालकावर चिडले होते. दुपारी दोन दरम्यान स्वारगेटहून एसटी बस धाराशिवकडे निघाली. पुणे जिल्ह्यातील यवतजवळ एका महिला प्रवाशाने एसटी चालकाला चांगलेच झापले. त्यासोबत इतर प्रवाशांनीदेखील एसटी चालकाला खडे बोल सुनावले आणि फास्ट चालवा असे सांगितले. बस चालक रागाच्या भरात हायवेवर एसटी बस थांबवून तशीच चालू ठेवून निघून गेला

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
गाढव फजिती हा शब्द तुम्ही ऐकला असेल. जणू त्याचीच प्रचिती एसटी प्रवाशांना आली. गाडी फास्ट चालवण्याचा तगादा प्रवाशांनी ड्रायव्हरकडे लावला. अन वैतागलेला एसटी चालक रागाच्या भरात एसटी बस हायवेवर बाजूला लावून निघून गेला. पठ्ठ्या अर्ध्यातासाने आला. Maharastra state tourism

एसटी बसच्या चालकाने यवतजवळ एसटी बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि तो अचानक पळून गेला. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत हायवेवर थांबावे लागले. हा धक्कादायक प्रकार प्रवाशांनी फेसबुक लाईव्ह करून समोर आणला आहे.

त्याचे झाले असे..
बोरिवली ते धाराशिव जाणारी एसटी बस (एम एच 09 ईएम 9726) शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बोरिवली येथून धाराशिवकडे जाण्यासाठी निघाली. ही गाडी बोरिवली-पुणे -इंदापूर – बार्शी मार्गे धाराशिवकडे निघाली होती. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही गाडी यवत (पुणे) येथे पोहचली. गाडीतील प्रवाशाने गाडी फास्ट चालवा फास्ट चालवा म्हटल्याने चालक रागाच्या भरात रस्त्याच्या कडेला गाडी लावून निघून गेल्याची घटना घडली. त्यानंतर जवळपास अर्धा तास प्रवासी ताटकळत महामार्गावर थांबले होते. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अहमद शेख या व्यक्तीने शेअर केला आहे.

पठ्ठ्याने घडविली अद्दल
बोरिवली ते पुणे दरम्यान बस चालकाने जवळपास तीन ते चार तास उशीर केला होता. त्यामुळे बोरिवलीहून निघालेले प्रवाशी चालकावर चिडले होते. दुपारी दोन दरम्यान स्वारगेटहून एसटी बस धाराशिवकडे निघाली. पुणे जिल्ह्यातील यवतजवळ एका महिला प्रवाशाने एसटी चालकाला चांगलेच झापले. त्यासोबत इतर प्रवाशांनीदेखील एसटी चालकाला खडे बोल सुनावले आणि फास्ट चालवा असे सांगितले. बस चालक रागाच्या भरात हायवेवर एसटी बस थांबवून तशीच चालू ठेवून निघून गेला.

फेसबुक लाईव्ह केले
संतापलेल्या प्रवाशांनी कंडक्टरकडे पैसे परत मागितले व फेसबुक लाईव्ह केले. व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना पाहून कंडक्टरने ड्रायव्हरला फोन करून परत बोलावून घेतले. जवळपास अर्ध्या तासानंतर एसटी बस चालक परत आला आणि पोलीस तक्रार करण्यासाठी गेलो होतो अशी माहिती दिली. प्रवासी महिला मला सतत गाडी फास्ट चालवायला सांगत होती. त्याचा मला मानसिक त्रास झाला. त्याची फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो होतो असे चालकाने परतल्यावर सांगितले.

प्रवासाला लागले सात तास
कंडक्टर व इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत पुन्हा एसटी बस चालवण्याची विनंती केली. अहमद शेख या प्रवाशाकडून अधिक माहिती घेतली असता, दुपारी दोन वाजता स्वारगेटहून बार्शीकडे निघालो आहे. रात्रीचे नऊ वाजले तरी अजूनही प्रवास सुरू आहे. नेहमी साडेतीन ते चार तासांत बार्शीला जातो. पण या एसटी बस चालकाने सावकाश चालवत सात तासांत बार्शीला पोहोचवले, असे सांगितले.

गाड्या झाल्या जुन्या
एसटी महामंडळाकडून लांबच्या प्रवासाला पाठविण्यात येत असलेल्या गाड्या जुन्या असल्याचे प्रवाशांचे म्हणजे आहे. या जुन्या गाड्या इतर वाहनांच्या तुलनेत फार कमी वेगाने धावतात. अनेकदा भर रस्त्यात गाड्या बंद पडत असतात. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका