ताजे अपडेट

डिकसळमध्ये वन्यप्राण्यांची पाण्यासाठी तडफड

पाणवठे कोरडे; वनविभाग बेफिकीर

Spread the love

(सांगोला/ नाना हालंगडे) सांगोला तालुक्यातील डिकसळ मध्ये वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी तडफड पहावयास मिळत असून,पाणवठे कोरडे थाक पडले आहेत. त्यामुळे याच प्राण्यांचा वावर मानव वस्तीत वाढला आहे.बेफिकीर असलेला वनविभाग मात्र कोणत्याच प्रकारची तसदी घेत नाही.त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सांगोला तालुक्यातील डिकसळ येथे मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे.यामध्ये वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहे. यांचा हा वावर गावाच्या पश्चिम,दक्षिण अन् उत्तर दिशेला मोठ्या प्रमाणात आहे. पण काही दिवसापूर्वी याच वन विभागाचे चमच्यांचे ईकुन पूर्वेला बोअर घेतला. येथे एक पाणवठा पण यात ही कधी पाणी सोडले नाही.राहिला प्रश्न गावाच्या पश्चिमेला असलेल्या पाणवठ्याच्या येथे तर कधीच पाणी सोडले जात नाही.येथे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आहेत.यांना पिण्यास पाणीच नसल्याने यांचा वावर मानव वस्तीत वाढलेला आहे.

याबाबत सांगताना साहेबराव इंगोले म्हणाले, आमच्या इंगोले_पवार वस्तीलागत असलेल्या फॉरेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात तरस,लांडगे, कोल्हे,हरीण,सायाल,मोर् यांच्यासह अन्य प्राणी आहेत. यांना पिण्यास पाणी नाही.याबाबत वारंवार संबंधिताना सांगितले पण कोणीच लक्ष देत नाही.आता तर आमच्या गावातील लोकांनाच पिण्यास पाणी नाही येथे वनविभाग काय करणार.तर सध्या ज्याठिकाणी पाणवठा आहे,त्याठिकाणी दुचाकी जावू शकत नाही,तेथे हा विभाग पाणी कसे सोडणार.

ज्याठिकाणी आमच्या गावाच्या नावावर बोअर पाडला, सौरऊर्जेवरील यंत्रणा कार्या्वित केली,ती काय उपयोगाची.सगळं फॉरेस्ट जनावरांसाठी मोकळं आहे.येथील झाडे,ही तोडतोडीने नष्ट झाली आहेत. गावाच्या पश्चिमेला असलेला पाणवठा वन्यप्राण्यांसाठी खूप उपयुक्त आहे. पण येथे पाणी सोडले जात नाही. वनविभागाला बुक्का लावणारे अधिकारी अन कर्मचाऱ्यांनी आपल्याच धुंदीत आहेत. वनपाल, वनरक्षक व वनमजूर कोण आहेत? हेच गावकऱ्यांना माहीत नाही. गेली 10 वर्षात याच गावात एकही काम केले नाही.जे फॉरेस्टचे गाळे आहेत.त्याचा हिशोब नाही. याच फॉरेस्टमध्ये अनेक ठिकाणी झाडे तोडलेले बुडले अन् जळणाचे फेस पहावयास मिळत आहेत.

उन्हाळ्यातही सोडले नव्हते पाणी
डिकसळ येथील वन्यप्राण्यांचे पाणवठे नावालाच आहेत. ऐन उन्हाळ्यात कधी पाणी सोडले आता तर काय घेवून बसलाय. पावसाळा सुरू होवून,तीन महिने झाले पण अद्यापपर्यंत येथे पाऊस नाही. त्यामुळे वारंवार कोरडे पाणवठेच येथे पहावयास मिळत आहेत.याच्याच लगत झाडे तोडलेल्याचे बुंधे पाहवयास मिळत आहेत.याच पाणावठ्यात पाणी सोडा म्हणून वनविभागाला सांगितले की,तेवढ्या पुरताच दिखाऊपणा पहावयास मिळतो. पण एक ही मायीचा लाल हे पाणी सोडण्याचे धाडस करीत नाही.

बोअर, सौरऊर्जा नावालाच
सांगोला वनविभागाचे डिकसळ गावातील जनतेला विचारात न घेताच,गावाच्या पूर्वेकडील भागात ही सुविधा केली. पण ही बिनकामाची.येथील गावाच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात.फॉरेस्ट अन् वन्यप्राणी आहेत. येथील पाणवठे कायमचे कोरडे असतात.हे वनमजूर, वनरक्षकाला माहीत आहे. त्यामुळे सध्या.ज्याठिकाणी ही यंत्रणा आहे,ती निरुपयोगी आहे. हे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला माहीत नाही का? अशा या गोष्टी हे करीत नसतील तर फॉरेस्ट हे काय राखणार.असा सवाल जनता करू लागली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी काय करतायेत
सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनपरिक्षेत्र आहे.वनरक्षकासह, वनमजुरांच्या नेमणुका आहेत. पण हे कोणत्या राज्यात असतात हे समजत नाही. डिकसळ येथील पाणवठ्याच्या नेहमीचाच गलका होतो. पण येथे पाणी सोडले जात नाही.हे असे का? तालुक्याचे वनपरिक्षेत्र काय करतायेत.याच वनविभागातील चंमच्यांचा यांनी बंदोबस्त करावे.पाणवठ्यात पाणी सोडावे. नुसत्या गाड्या अडवून वृक्षतोड थांबणार नाही.त्यासाठी जनतेत मिसळून कामे केली पाहिजे.

भीषण दुष्काळाची दाहकता
ऐन पावसाळ्यात सांगोला तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळाची दाहकता वाढली आहे.अक्षारक्षा चिमणीस पिण्यासही पाणी नाही.येथे फॉरेस्टमधील पणावठ्यांची अवस्था तर न पाहवणारी अशीच. पण कर्तव्याची जान नसलेला हा विभाग सांगोला तालुक्यात मनमानीप्रमाणे काम करीत आहे.वन्यप्राणी पाण्यासाठी सौरभैर झाले आहेत.त्यांचा.वावर मानववस्तीत वाढला आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका