
सांगोला/ नाना हालंगडे
कोल्हापूर आगाराची सोलापूर ते कोल्हापूर एसटी काल गुरुवार रात्री सव्वा सात वाजता सांगोला सूतगिरणी जवळील मुख्य हायवे वर बॅटरीचा स्पोट झाल्याने पेटली. याच दरम्यान गाडीत ७१ प्रवाशी होते. पण चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली अन् पुढील धोका टळला.
याबाबत माहिती अशी की कोल्हापूर आगाराची सोलापूर ते कोल्हापूर बस क्रमांक एमएच १४ बीटी ३५५२ ही कोल्हापूरकडे चालली होती.सायंकाळी सात वाजणेच्या सुमारास ही सांगोला आगारात आली.त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात ही कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली.आगारापासून दोन किमी अंतरावर गेली असता. चालकाच्या जवळ असलेल्या बॅटरीतून अचानक धूर निघू लागला. त्याच दरम्यान मोठ्या प्रमाणात ठिणग्या ही पडू लागल्या. दरम्यान याच बॅटरीचा स्फोट झाला. ही घटना सांगोला सूतगिरणी जवळ रात्री ७:१५ च्या दरम्यान घडली. यावेळी गाडीत ७१ प्रवाशी होते.
यावेळी चालक सोनवने यांनी धोका ओळखत ही गाडी जागेवर थांबविली गाडीतील अग्नीशामक यंत्राद्वारे ही काहीच केल्या आग् विजेना. त्याचवेळी समोरुन सूतगिरणीचा पाण्याचा टँकर येत असताना ही आग आटोक्यात आली. दरम्यान चालक सोनवले अन् वाहक तेली यांनी सर्व प्रवाशांना सुरक्षित गाडीतून खाली घेतं मोठ्या धोक्यापासून बचाव केला. याच दरम्यान पुढील प्रवाशांना दुसऱ्या गाडीतून मार्गस्थ करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक भीमराव खंणदाळे यांनी पोलिस फौजफाटा पटवून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्यतीचे पर्यंत केले.
पोलिस निरीक्षकानी तात्काळ घेतली दखल
सांगोला सुत गिरणी समोर रात्री सव्वा सात वाजता एसटी बस पेटली असता,पोलिस निरीक्षक खणदाळे यांनी तात्काळ दखल घेत सपोनी माहुरकर आणि फौजफाटा पाठवून मदत केली. याच दरम्यान सांगोला आगारातील काही जणांनी ही मदतीचा हात दिला.त्याच बस मधील ७१ प्रवाशांना दुसऱ्या बस मधून मार्गस्थ ही केले.
राज्यभर एसटीचा राडा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनच्या एसटी बसेस सतत राडा करीत आहेत.त्यात सांगोला आगार ही सर्वाधिक चर्चेत आहे.याबाबत कोणीच लोकप्रतिनिधी आवाज उठवीत नाहीत वा दखल घेत नाहीत.त्यामुळे जनतेला नाहक त्रास देणाऱ्या बसेस मधून प्रवास करावा लागत आहे. त्यात शालेय मुलांचे तर बेहाल होत आहे.
धावती एसटी पेटली
सांगोला आगारातून कोल्हापूर कडे जाणारी धावती एसटी रात्री ७:१५ वाजता अचानक बॅटरी ब्लॉस्त झाल्याने पेटली.याच वेळी चालकाने प्रसंगावधान राखत गाडी जागेवर थांबविली गाडीतील अग्निशामक यंत्राद्वारे प्रयत्न केला.पण काही केल्या आग थांबेना.त्याच दरम्यान सुत गिरणीच्या टँकर द्वारे ही आग आटोक्यात आणली.