साहित्यिकांनी समाज प्रबोधनावर भर द्यावा : सभापती राम शिंदे
प्रा.डॉ.किसन माने यांना छत्रपती राजे संभाजी साहित्य पुरस्कार

सांगोला / डॉ.नाना हालंगडे
साहित्यिकांनी नवा विचार देण्याबरोबर ऊर्जा देण्याचे ही कार्य केले. शोषित,वंचित, पीडितांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या.आजही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांचे प्रबोधन करण्यावर साहित्यिकांनी भर द्यावा,असे मत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
वेगवेगळ्या कालखंडात साहित्यिकांनी आपल्या लेखनीने समाजाला सजग केले आहे. साहित्यिकच लोकशाहीचा पाचवा स्तंभ आहे,म्हणून खऱ्या अर्थाने साहित्यिकच लोकशाहीला वाचू शकतील. यासाठी साहित्यिकांची ताकद ओळखून त्यांना बळ देण्याची नितांत गरज आहे,असे विधानपरिषदेचे आम. सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेड यांच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण प्रसंगी आपले विचार प्रखरपणे मांडले.
पुढे ते म्हणाले की, विधिमंडळात काम कसे करावे, लोकांचे प्रश्न कसे सोडवावेत, समाजकारण, राजकारण कसे करावे,याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे ११ वेळा सांगोला विधानसभेमध्ये निवडून आलेले स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख होय.अशा व्यक्तीवर प्रा. डॉ. किसन माने यांनी लिहिलेले राजकीय मानदंड भाई गणपतराव देशमुख हे चरित्र राजकारणाच्या पडझडीची दिशा बदलू शकते.आज राजकारणात विश्वास ठेवावा आणि त्यांच्या पायावर माथा टेकवावा अशी माणसं कमी होत आहेत. अशावेळी आम.गणपतराव देशमुख यांची आठवण येते.असे मत ही शेवटी त्यांनी व्यक्त केले. प्रा. डॉ. किसन माने यांच्या राजकीय मानदंड भाई गणपतराव देशमुख पुस्तकाला मराठी साहित्य प्रतिष्ठान, जामखेड यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य व संस्कृती मंडळ आणि मराठी साहित्य प्रतिष्ठान,जामखेड यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. राजेश गायकवाड,प्रसिद्ध मराठी चित्रपट गीतकार व कवी बाबासाहेब सौदागर,पुणे येथील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे,साहित्यिक विलास सिंदगीकर,गोव्यातील डॉ. चिन्मय घैसास, डॉ. प्रा. मधुकर राळेभात,अवधूत पवार, डॉ. विद्या काशीद, प्रकाश होळकर, डॉ. सुधाकर शेलार, विजय जाधव, डॉ. स्मिता पाटील, हनुमंत चांदगुडे, पुरस्कार mप्राप्त साहित्यिक व अन्य साहित्यिक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी उद्घाटन सत्र परिसंवाद काव्यसमेलन व पुरस्कार वितरण सोहळा असा दिवसभर संमेलनातील कार्यक्रमाने उपस्थितीतांची मने जिंकून घेतली. सदर पुरस्कार प्रा. किसन माने प्राप्त झाल्याने महाराष्ट्रातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, राजकीय व अन्य क्षेत्रातील मित्र व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मराठीचे गाढे अभ्यासक
घेरडी गावचे सुपुत्र, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.डॉ.किसन माने हे मराठी विषयाचे गाढे अभ्यासक आहेत.यांची बरीच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.हे पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ही करतात.अशातच यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाशित केलेल्या राजकीय मानदंड_डॉ.भाई गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित चरित्र ग्रंथाला महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य व संस्कृती मंडळ तसेच मराठी साहित्य प्रतिष्ठान,जामखेड यांच्या वतीने पुरस्कार देवून गौरविण्यात आले.आजपर्यंत अनेक पुरस्काराने यांना गौरविण्यात आलेले आहे.