
सोलापूर : विशेष प्रतिनिधी
सोलापूरातील मा. नगरसेवक ॲड. अविनाश बनसोडे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्णपदक” प्रदान करण्यात आले. विद्यापीठाच्या ३३ व्या दीक्षांत संमारोहात ॲड. बनसोडे यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र देण्यात आले.
या प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदिशकुमार, मा. कुलगुरू प्रा. विजय माहेश्र्वरी, प्र. कुलगुरू प्रा. सोपान इंगळे इ. मान्यवर मंचावर उपस्थित होते.
जळगाव विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे प्रशाळेच्या विभागातील डॉ. आंबेडकर विधारधारा या विषयातील एम.ए. च्या सन २०२३ – २४ परिक्षेत प्रथम क्रमांक मिळविल्याबंद्दल ॲड. बनसोडे हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत.
यासाठी त्यांना विभाग प्रमुख प्रा. डॉ. राकेश रामटेके, प्रा. डॉ. विजय घोरपडे, प्रा. डॉ. समाधान बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
ॲड. अविनाश बनसोडे हे सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक असून आंबेडकरी साहित्यिक आहेत. याआधीच इतिहास विषयात एम.ए. उत्तीर्ण असताना पुन्हा डॉ. आंबेडकर विचारधारा या विषयात सुर्वणपदकासह एम.ए. चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.