जवळे येथे मध्यान्य भोजन योजनेचा मा.आ. दीपक आबा साळुंखे- पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
जवळा : विशेष प्रतिनिधी
जवळे कामगार आयुक्त महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत जवळे यांच्या संयुक्त विद्यमाने संघटित व असंघटित कामगार स्त्री व पुरुष यांना मध्यान्य भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून या योजनेचा जवळे ग्रामपंचायत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील यांच्या हस्ते व युवा नेते डॉ.पियुष दादा साळुंखे- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
या योजनेअंतर्गत जवळे ग्रामपंचायत व समाज मंदिर भीमनगर येथे दररोज एकूण 300 लोकांची मध्यान्य भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये चपाती, दोन भाज्या, भात असा सकस आहार मिळणार आहे. मध्यान्य भोजन योजनेचा निराधार लोकांना आधार मिळणार आहे.
सदर प्रसंगी अरुण भाऊ घुले-सरकार, उपसरपंच नवाज खलिफा, सुनील आबा साळुंखे, विजयकुमार तारळकर, अनिल सुतार निसार शेख, विठ्ठल गयाळी, बाबासाहेब इमडे, सज्जन मागाडे, रसाळ भाऊसाहेब,राजेंद्र डुकरे, बाळासाहेब गावडे आनंदा नायकुडे, संतोष पाटील, पोपट नाडगे, पोलीस पाटील अतुल गयाळी, दीपक कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.