सांगोला : विशेष प्रतिनिधी
आपल्या आमदारकीच्या काळात आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटांत लाखो रुपयांची विकास कामे केली आहेत. राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या जवळा जिल्हा परिषद गटात असंख्य कामे मार्गी लावली आहेत.
जवळा जिल्हा परिषद गटातील आलेगाव, बामणी, देवळे, जवळा, मांजरी, मेडशिंगी, मेथवडे, राजापूर, संगेवाडी, सावे, वाकी – घेरडी, वाणीचिंचाळे, वाढेगाव या गावांमध्ये लाखो रुपयांची विकास कामे केली आहेत.
निधी वाटपात कोणताही दूजाभाव न करता शहाजी बापूंनी विकासाचा प्रकाश लक्खपणे गावे – वाड्या वस्त्यांवर पोहोचविला आहे. अनेक गावांत मुस्लिम समाजासाठी इदगाह दर्गाचे सुशोभीकरण, दलीत वस्तीमध्ये रस्ते, समाज मंदिरे, हायमास्ट दिवे, लिंगायत स्मशानभूमीची कामे, विविध गावांना जोडणारे रस्ते, गावांतील अंतर्गत रस्ते, पेव्हींग ब्लॉक, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटकरण, वाचनालयांसाठी ग्रंथ संपदा, अनेक गावांतील बंधाऱ्यांची दुरुस्ती, मंदिरांच्या सभा मंडपांची कामे, विद्युत डिपी, शौचालये, पाणंद रस्ते, द्वारयुक्त बंधारे, पशू संवर्धन दवाखान्यांचे बांधकाम, साठवण तलावांचे बांधकाम अशी असंख्य कामे केली आहेत.
जवळा जिल्हा परिषद गटातील आलेगाव, बामणी, देवळे, जवळा, मांजरी, मेडशिंगी, मेथवडे, राजापूर, संगेवाडी, सावे, वाकी – घेरडी, वाणीचिंचाळे, वाढेगाव या गावांमध्ये लाखो रुपयांची विकास कामे केली आहेत.
विविध गावातील कामे, निधीचे स्वरूप खालील प्रमाणे…
जवळा
जवळा गावात एकूण २३ कोटी ९६ लाखांची कामे केली आहेत. एकूण कामे : ४०, पूर्ण कामे : २०, सुरू कामे : ३, निविदा प्रक्रिया : १४, प्रलंबित कामे : ३.
आलेगाव
एकूण कामे : आलेगावमध्ये एकूण २० कोटी १२ लाखांची कामे केली आहेत. एकूण कामे: २४, पूर्ण कामे : १५, सुरू कामे : २, निविदा प्रक्रिया : ७, कोणतेही काम प्रलंबित नाही.
बामणी
बामणी गावात ३ कोटी ४७ लाख रुपयांची विकास कामे केली आहेत. एकूण कामे : १५, पूर्ण कामे : १०, निविदा प्रक्रिया : २, प्रलंबित कामे : ३.
सावे
सावे गावात एकूण २ कोटी ५ लाख रुपयांची विकास कामे केली आहेत.
वाकी घेरडी
वाकी घेरडी गावात ११ कोटी ५७ लाख रुपयांची विकास कामे केली आहेत.
देवळे
देवळे गावात ३ कोटी ८५ लाखांची कामे केली आहेत.
संगेवाडी
संगेवाडी गावात ३ कोटी ११ लाख रुपयांची विकास कामे केली आहेत.
मांजरी
मांजरी गावात ४ कोटी ३८ लाख रुपयांची विकास कामे केली आहेत. एकूण कामे : २२, पूर्ण कामे : १६, सुरू कामे : २, प्रलंबित कामे : ४.
मेडशिंगी
मेडशिंगी गावात १४ कोटी २१ लाख रुपयांची विकास कामे केली आहेत. एकूण कामे : २८, पूर्ण कामे : १८, सुरू कामे : ३, निविदा प्रक्रिया : ४, प्रलंबित कामे : ३.
मेथवडे
मेथवडे गावात एकूण ३ कोटी ३७ लाखांची कामे केली आहेत. एकूण कामे : १७, पूर्ण कामे : १४, सुरू कामे : १, निविदा प्रक्रिया : २.
राजापूर
राजापूर गावात ११ कोटी ७९ लाखांची कामे केली आहेत. एकूण कामे : ९, पूर्ण कामे : ६, सुरू कामे : ३.
वाणी चिंचाळे
वाणी चिंचाळे गावात २९ कोटी ४७ लाख रुपयांची विकास कामे केली आहेत. एकूण कामे : १२, पूर्ण कामे: ६, सुरू कामे : १, निविदा प्रक्रिया : १, प्रलंबित कामे : ४.
वाढेगाव
वाढेगाव मध्ये शहाजी बापूंनी तब्बल २४ कोटी २० लाख रुपयांची विकास कामे केली आहेत. एकूण कामे : २७, पूर्ण कामे : २०, सुरू कामे : १, निविदा प्रक्रिया : १, प्रलंबित कामे : ५.
विविध गावात झालेल्या विकास कामांची सविस्तर यादी खालील प्रमाणे…
(संदर्भ : “पाणीदार आमदार” कार्य अहवाल -२०२४)