सांत्वनासाठी गेलेल्या नेत्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
डिकसळचे दामजी करांडे यांचे दुःखद निधन
सांगोला/ विशेष प्रतिनिधी
मित्राच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले सांगोला तालुक्यातील डिकसळ गावचे रहिवासी, माजी ग्रामपंचायत सदस्य दामोदर कृष्णा करांडे (वय ५९) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने सोमवारी सायंकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. जत तालुक्यातील दरिबडची येथे ही घटना घडली. त्यांच्या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.
दामजी हे गावातील सुप्रसिद्ध असे मोटार मॅकनिकल होते. हसरा चेहरा अन् गमतीशीर भाषा बोलून सतत माणसात रमणारा हा लोकप्रिय असाच मोहरा होता. गेली २० वर्षाहून अधिक काळापासून ते गावात व आसपासच्या गावातील प्रसिद्ध असे मेकॅनिकल म्हणून सुपरिचित होते.
सोमवारची सायंकाळ डिकसळ गावासाठी दुःखाची ठरली. त्याचे झाले की, असे दामजी यांचे पारे येथील मित्र सावंत यांचे नातेवाईक असेच अन्य एका मित्रांचे नातेवाईक यांच्या घरी जत तालुक्यातील दरिबडची येथे दुपारी गेले होते. त्या दोन्ही कुटुंबीयांच्या घरी दुःखद घटना घडल्याने सात्वनपर भेट घेण्यासाठी हे दोघे गेले होते. दरम्यान याच गावात दामजी यांचे अन्य पै-पाहुणे मोठ्या संख्येने आहेत. ते त्यांच्या भेटीगाठी घेत होते. त्याच वेळी दरिबडची येथे चहा पीला अन् दामजी यांना अचानकच अटॅक आला. दरम्यान उलटी झाली. त्यातच त्यांची प्राणज्योत सायंकाळी सहा वाजता मालवली. यापूर्वीही यांना दहा वर्षापूर्वी अटॅकने घाला घातला होता.
खूपच मनमिळाऊ अन् गमतीशीर स्वभावाचे असलेले दामा फिटर यांच्या अकाली जाण्याने कोणालाच विश्वास बसत नाही. राजकारणाचे तर त्यांना प्रचंड वेड होते. प्रत्येक निवडणुकीत ते हिरारीने समभाग नोंदवित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, दोन मुली, सूना नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या अत्यांविधीचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
राजकारणी ते फिटर
दामजी हे गावातील हसतमुख, तसेच गावासह आसपासच्या गावातील सुप्रसिध्द असे फिटर होते. सतत हसरा चेहरा अन् वेगवेगळ्या गप्पाटप्पात ते नेहमी चर्चेत असायचे. त्यांना राजकारणाचे प्रचंड असे व्यसन होते. प्रत्येक निवडणुकीतील त्यांचा सहभाग गावांसाठी प्रेरणादायी असाच होता. त्यांच्या चार बंधूंचे मोठे असे कुटुंब गावात सर्वांशी मिळून मिसळून होते. मोटार मेकॅनिकल ते घरातील सर्वच इलेक्ट्रिकची कामे चागल्या पद्धतीने करी होते. ते जरी दुकानात असले तरी त्यांच्या भोवती लोकांची गर्दीच असायची. त्यांच्या या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. एकमात्र राजकारणी ते फिटर अशीच ओळख अशी कायमचीच राहणार आहे.