मेघानिवास परिटाच्या घरी; मेघाधीप रवी असल्याने पाऊस तुरळक पडेल, रोगराई वाढेल
गुढीपाडवा पंचांगवाचन.....

सांगोला/डॉ.नाना हालंगडे
मराठी नववर्षाची सुरुवात आज रविवार ३० मार्चपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून होणार आहे.आजही ग्रामीण भागात ग्रामदेवतेच्या मंदिरात पंचांग वाचन होत असून,देशात मोठ्या प्रमाणात राजकारणात उलथा पालथ होणार आहे.यंदाचा पाऊस परिटाच्या निवासस्थानी असून,दोन आढक प्रजन्यमान होणार आहे.उंदीर व टोळ यांचा उपद्रव वाढेल.पाऊस कमी जादा पडेल.धान्य वृध्दी होईल.लोकांमध्ये राग व लोभ हे विकार वाढतील.
जसा मे महिना सुरू होईल तसे वादळास् सुरुवात होईल.त्याच बरोबर ७ जुन २०२५ पासून ते २३ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत हा पाऊस कमी जादा प्रमाणात कोसळणार आहे.२२ जुन ते १० ऑगस्ट या काळात मुबलक पाऊस होईल.काही भागात जनजीवन विस्कळीत होईल.१९ एप्रिलची बुध शुक्र युती आणि १८ मे ची रवी गुरू युती आणि ग्रह मानाचा विचार करताच एप्रिल व मे महिन्यात उष्णतामान खूप वाढेल.
यावर्षी सरसरी भरून निघेल इतका पाऊस पडणार नाही.एकंदरीत आर्द्रा,पूनवर्सू, पुष्य,आश्लेषा हस्त व चित्रा नक्षत्राचा पाऊस समाधानकारक होईल. यावर्षी पाऊस समाधानकारक असाच असून,८ जून रोजी निघणाऱ्या मृगाचा कोल्हा,२२ जून रोजी निघणाऱ्या आर्द्राचा उंदीर,५ जुलै रोजी निघणाऱ्या पुनवसूच्या घोड्याने,१९ जुलै रोजी निघणाऱ्या पुष्यच्या मोराने,२ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या आश्लेषा च्या गाढवाने,१६ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मघाने पुन्हा बेडकाने ,३० ऑगस्ट रोजी निघणाऱ्या पूर्वाचे वाहन म्हैस आहे.१३ सप्टेंबर रोजी निघणाऱ्या उत्तराने पुन्हा कोल्हार धुडगूस माजनार आहे.२७ सप्टेंबर रोजी निघणाऱ्या हस्तांने पुन्हा मोर नाचविनार आहे.१० ऑक्टोंबर रोजी निघणाऱ्या चित्रा नक्षत्र हत्तीवर बसून आलेले आहे.तर शेवटचे स्वाती नक्षत्र २४ ऑक्टोंबर रोजी पुन्हा बेडकावर बसून आलेले आहे.असा हा यावर्षातील पाऊस आहे.
यावर्षी आगीपासून आणि चोरा पासून त्रास वाढेल.लोकांमध्ये रक्ताचे विकार वाढतील.रसांचा अधिपती गुरू असल्याने पाऊस चांगला पडेल.केशर,कापड, फळे हे विपुल प्रमाणात मिळतील. ऊस,चंदन व सोने मुबलक मिळेल.रोगराई वाढेल. निरसांचा अधिपती मंगळ असल्याने पोवळे,तांबडे कापड,रक्तचंदन,तांबे यांच्या किंमती वाढतील.यावर्षीचा वारून नावांचा मेघ असल्याने यज्ञ_याग होतील.सर्वत्र आनंद होईल.सोसाट्याच्या वाऱ्यासह पुष्कळ पाऊस पडेल.पृथी जलमय होईल.
पाऊस परिटाच्या घरी
ज्या जुन्या म्हणी असतात,त्याला तिलांजली देत चला.यावर्षी हटके असाच पाऊस होणार आहे.दोन आढक पाऊस म्हणजे सहा भाग नद्या व पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर पाऊस पडेल.उष्णता खूप वाढेल.१० मे नंतर वादळी वारे,पाऊसास सुरुवात होईल.देशाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथा पालथ होईल.लोकांमध्ये राग व लोभ हे विकार वाढतील.रोगराई वाढून लोक सुखी होणार नाहीत.
क्लीन चिट मशीन
सध्याचे सरकार हे क्लीन चीट मशीन सारखे काम करीत आहे.कोणत्याही पक्षात राम राहिली नाही.विश्वासहर्ता काहीच नाही.लोकशाही खऱ्या अर्थाने नांदत नाही.पण हे फार काळ टिकणारे नाही.जनता ही हुशार आहे.त्यामुळे राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथा पालथ होणार आहे.त्यामुळे सध्या सर्वत्र लै लो भाई..क्लीन चीट लै लो….असेच दिसत आहे.
इसवी सन २०२५-२६
खऱ्या नववर्षाची सुरुवात आज गुढीपाढव्यापासून झालेली आहे.विक्रम संवत २०८१_८२ असे स्वरिस्त श्रीमंनुपशालिवाहन शक १९४७ विश्र्वावसूनाम संवत्सर असेच वर्ष आहे.यावर्षी अनेक बाबीने हे वर्ष सुखदायी असेच आहे.पाऊसमानही चांगला आहे.आजपासून पुन्हा कडाक्याचे ऊन मोठ्या प्रमाणत वाढणार आहे. अकरावी नक्षत्रात पाऊस चांगला आहे.पण काही फरकाच्या अंतराने पाऊस ही दीड महिना कोसळनार आहे.
पाडवा संपताच अवकाळी
रविवार ३० मार्च २०२५ रोजीचा गुढी पाडवा संपताच अवकाळी पाऊसास सुरुवात होणार आहे.हा पाऊस तब्बल राज्यात सर्वत्र ७ एप्रिल पर्यंत कोसनार आहे.वादळी वाऱ्याने हाहाकार माजेल.