थिंक टँक स्पेशलविज्ञान/तंत्रज्ञान

गुगलमध्ये लवकरच मोठा बदल, सर्च इंजिनला AI ची जोड

Spread the love

गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. गेल्या 20 वर्षांपासून प्रत्येक छोटी-मोठी माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्चचा वापर केला जात आहे. यूएसमधील या टेक फर्मचा मुख्य व्यवसाय ‘सर्च इंजिन’ आहे आणि मूळ कंपनी अल्फाबेटच्या कमाईचा निम्मा वाटा याचा आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
गुगल सर्च इंजिन वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सर्च इंजिन गुगलमध्ये (Google) लवकरच मोठा बदल होणार आहे. गुगल सर्च इंजिनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सामावून घेतलं जाणार आहे. गुगलचे सीईओ (Google CEO) सुंदर पिचाई यांनी याबाबत वक्तव्य केलं. याद्वारे चॅटजीपीटीसारखे (ChatGpt) उत्तर गुगलवर मिळणार आहे. (Google CEO Sundar Pichai)

ही बातमी द वॉल स्ट्रीट जर्नलने प्रकाशित केली आहे. Chat Gpt या नव्या तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविण्यास सुरुवात केली आहे. Chat Gpt या नव्या तंत्रज्ञानाकडे सर्व जग आकृष्ट होत असताना आता जगातील लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलने काळाची पावले ओळखून हा बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे.

एआयमुळे घडेल परिवर्तन
आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील (AI) सुधारणेमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या शोधांना प्रतिसाद देण्याच्या गुगलच्या (Google) क्षमतेमध्ये वाढ होणार आहे, असे सुंदर पिचाई यांनी सांगितले आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे की, भविष्यात गुगल सर्चमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सपोर्ट केला जाईल, त्यानंतर शोध आणि निकाल अधिक चांगले आणि अचूक असतील.

गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. गेल्या 20 वर्षांपासून प्रत्येक छोटी-मोठी माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्चचा वापर केला जात आहे. यूएसमधील या टेक फर्मचा मुख्य व्यवसाय ‘सर्च इंजिन’ आहे आणि मूळ कंपनी अल्फाबेटच्या कमाईचा निम्मा वाटा याचा आहे.

गुगल अनेक वर्षांपासून सर्च इंजिन मार्केटच्या शिखरावर आहे आणि मायक्रोसॉफ्टच्या अनेक प्रयत्नांनंतरही गुगला टक्कर देता आलेली नाही. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मायक्रोसॉफ्टला आशेचा किरण दाखवला आहे. मायक्रोसॉफ्टने ChatGPT सोबत आपलं सर्च इंजिन Bing रिलॉन्च केलं, ज्याला युझर्सची पसंती मिळत आहे. गुगनेही ही बाब ओळखली आणि संधी न दवडता आपला AI बॉट BARD सादर केला.

दोन दशकांपासून सर्च इंजिन जगतात अधिराज्य गाजवणाऱ्या कंपनीपुढे नवे आव्हान निर्माण झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित चॅटबॉट्स गुगलच्या सर्च इंजिन व्यवसायाला अडचणीत आणू शकतात. मात्र कंपनीने वेळीच हा धोका ओळखला. त्याताच भाग म्हणून सुंदर पिचाई यांनी कंपनीच्या गुगल सर्च इंजिनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट समाविष्ट करण्याची योजना आखत आहेत.

अलीकडेच कंपनीने Bard AI चॅटबॉट सादर केला होता. आता कंपनी ते गुगल सर्च इंजिनमध्ये जोडण्याची तयारी करत आहे.

मायक्रोसॉफ्टला टक्कर
मायक्रोसॉफ्टने यावर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या सर्चच इंजिन Bing मध्ये ChatGPT जोडून रिलॉन्च केलं होतं. यामुळे युझर्सना सर्चसोबतच चॅटबॉटचाही अनुभव मिळत आहे. यानंतर गुगलनेही मायक्रोसॉफ्ट आणि ChatGPT ला टक्कर देण्यासाठी BARD लॉन्च केलं. परंतु गुगलच्या या चॅटबोटला Bing एवढी लोकप्रियता मिळाली नाही.

याचं मोठं कारण चॅटबोटची उपलब्धता हे आहे. गुगलने भलेही BARD ची घोषणा केली, पण आतापर्यंत हे फीचर निवडक युझर्सपर्यंतच पोहोचलं आहे. तर मायक्रोसॉफ्टच्या New Bing च्या लॉन्चिंगनंतर सर्च इंजिनवर युझर्सची संख्या वेगाने वाढली आहे. अशात गुगलसमोर आपलं वर्चस्व टिकवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे.

गुगल अनेक वर्षांपासून सर्च इंजिन मार्केटच्या शिखरावर आहे आणि मायक्रोसॉफ्टच्या अनेक प्रयत्नांनंतरही गुगला टक्कर देता आलेली नाही. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मायक्रोसॉफ्टला आशेचा किरण दाखवला आहे. मायक्रोसॉफ्टने ChatGPT सोबत आपलं सर्च इंजिन Bing रिलॉन्च केलं, ज्याला युझर्सची पसंती मिळत आहे. गुगनेही ही बाब ओळखली आणि संधी न दवडता आपला AI बॉट BARD सादर केला. परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे आता कंपनी लवकरच आपल्या सर्च इंजिनमध्ये याचा समावेश करणाची शक्यता आहे.

असेच खास लेख वाचा नवे कोरे न्यूज पोर्टल “द थिंक इंडिया”वर

https://thethinkindia.com

चॅट जीपीटीचे तुफान!

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका